आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संकटात मदत:लॉकडाउनदरम्यान गरजूंच्या मदतीला पुढे आली ऋचा चड्ढा, गुरूद्वाऱ्यामध्ये दान केले धान्य 

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • रिचा चड्ढा म्हणाली, संकटकाळी तुमचे छोटे छोटे दानदेखील घडवतील बदल

कोरोना व्हायरस लॉकडाउनदरम्यान सेलीब्रिटी गरजूंना मदत करण्याचा प्रत्येक शक्य तो पर्यटन करत आहेत. ऋचा चड्ढादेखील धान्याची आणि अन्नाची व्यवस्था करताना दिसली. तिला जेव्हा कळाले की, तिच्या भागामध्ये असलेला एक गुरुद्वारा गरजूंना ऍन धान्य देऊन मदत करत आहे, तेव्हा ऋचाने त्वरित गुरुद्वाऱ्यामध्ये धान्य दान करण्याचे ठरवले. 

छोटे दानदेखील घडवतील बदल

ऋचा म्हणाली, 'यावेळी माणुसकी एका खूप कठीण प्रसंगातून जात आहे आणि माझा चांगुलपणावर पूर्ण विश्वास आहे. आपण सर्व एकमेकांशी जोडले जात आहोत, जवळ येत आहोत. ही महामारी आपल्यातील वाईट आणि चांगुलपणा दोन्ही समोर आणणारी आहे. काही लोक जातिवाद आणि सांप्रदायिक मुद्द्यांवर अजूनही वाद घालत आहेत. तसेच काही शिकले सावरलेले लोक मनुष्यांची आणि प्राण्यांचीही मदत करत आहेत. हे दान माझे एक खूप छोटेसे पाऊल आहे आणि सर्वांना माझा आग्रहदेखील आहे की, जेवढे शक्य असेल तेवढी मदत करा. हे गरजेचे नाही की, मोठे मोठे दानच करावे.'

रोज 250 किलो धान्याची गरज...  

ऋचा पुढे म्हणाली, "जेव्हा मी गुरुद्वारामध्ये संपर्क केला तेव्हा त्यांची एक अट होती की, ते दान म्हणून केवळ धान्य घेतील पैशांची मदत घेणार नाहीत. मी माझ्या जवळच्या किराणा दुकानातून जेवढे धान्य घेऊ शकत होते, तेवढे सामान घेऊन गुरुद्वाऱ्यामध्ये पोहोचवले. मला हेदेखील कळाले की, दररोज त्यांना 250 किलो धान्याची गरज पडते. मी प्रयत्न करत आहे की, मला एखाद्या होलसेल मार्केटमधून धान्य मिळावे जेणेकरून मी आणखी थोडे धान्य दान करू शकेन."

बातम्या आणखी आहेत...