आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 ऑक्टोबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार अली-ऋचा:सप्टेंबरमध्ये होणार प्री-वेडिंग पार्टी, 7 ऑक्टोबरला मुंबईत रिसेप्शन देणार कपल

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि ऋचा चढ्ढा त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सतत चर्चेत आहेत. नुकत्याच आलेल्या रिपोर्ट्सनुसार, 7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे कपल पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. त्याचबरोबर या महिन्यात या जोडप्याच्या लग्नाची प्री-वेडिंग पार्टी होणार आहे. याआधी 2020 मध्ये दोघेही लग्न करणार होते, पण कोरोनामुळे दोघांनीही लग्न लांबणीवर पडले होते.

30 सप्टेंबरपासून दिल्लीत कार्यक्रम सुरू होतील
ETimes च्या रिपोर्टनुसार, हे जोडपे 6 ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकणार आहे. 7 ऑक्टोबरला मुंबईत रिसेप्शन होणार आहे. त्याचबरोबर अली-ऋचाच्या लग्नाची प्री-वेडिंग पार्टी 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत होणार आहे. या लग्नात 4 फॅशन डिझायनर्स वेगवेगळ्या फंक्शन्ससाठी ऋचाचे ड्रेस डिझाइन करणार आहेत.

'फुकरे'च्या सेटवर झाली होती दोघांची भेट
काही महिन्यांपूर्वी ऋचाने एका मुलाखतीत त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितले होते. तिने सांगितल्यानुसार, ती 2013 मध्ये 'फुकरे'च्या सेटवर अलीला भेटली होती आणि दोघे चांगले मित्र बनले होते. ऋचाच्या प्रेमाचा स्वीकार करायला अलीने तीन महिन्यांचा कालावधी घेतला होता. दोघांनी पाच वर्षे त्यांचे रिलेशनशिप सिक्रेट ठेवले होतके. विक्टोरिया और अब्दुलच्या वर्ल्ड प्रीमिअरला दोघांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती.

आम्ही आमच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहोत - अली फजल
अली फजलने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, "आम्ही लग्न करण्यासाठी खूप आतुर आहोत. हे खूप दिवसांपासून प्रलंबित आहे. पहिल्यांदा लॉकडाऊनमुळे उशीर झाला आणि यावर्षी दुसऱ्या लाटेमुळे. जेव्हा लॉकडाऊन हटले तेव्हा आम्हा दोघांना आमच्या प्रोजेक्ट्सचे शूटिंग पूर्ण करायचे होते, त्यामुळे आम्हाला वेळ मिळू शकला नाही," असे काही महिन्यांपूर्वी अलीने सांगितले होते.

ऋचा आणि अलीचे आगामी प्रोजेक्ट्स ऋचा आणि अली दोघेही 'फुकरे 3' मध्ये एकत्र दिसणार आहेत. मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी 30 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर अली फजल 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. यात पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी शर्मा, कुलभूषण खरबंदा, विजय वर्मा आणि ईशा तलवार यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...