आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिचा-अली यावर्षी लग्न करणार:सप्टेंबरमध्ये दिल्ली- मुंबईत फंक्शन्स होतील; कोरोनामुळे दोनदा पुढे ढकलण्यात आले लग्न

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्ली आणि मुंबई येथे होतील लग्नाचे कार्यक्रम

बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि रिचा चढ्ढा सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. वृत्तानुसार, हे कपल 7 वर्षे डेटिंग केल्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. याआधी 2020 मध्ये दोघेही लग्न करणार होते, मात्र कोरोनामुळे दोघांनीही त्यांचे लग्न पुढे ढकलले होते.

दिल्ली आणि मुंबई येथे होतील लग्नाचे कार्यक्रम
हे जोडपे सप्टेंबरमध्ये एका खासगी समारंभात लग्न करणार असल्याचे नवीन रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. लग्नाचे दोन फंक्शन्स असतील, एक मुंबईत आणि दुसरा कार्यक्रम दिल्लीत होईल. रिचा आणि अलीच्या लग्नात त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. त्यांचे हळद आणि मेहंदी फंक्शन अतिशय ग्रॅण्ड असतील असे सूत्रांकडून समजते.

रिचा आणि अलीने व्हेनिसमध्ये त्यांचे नाते अधिकृत केले होते.
रिचा आणि अलीने व्हेनिसमध्ये त्यांचे नाते अधिकृत केले होते.

रिचा आणि अलीची लव्ह स्टोरी
रिचा आणि अली यांची पहिली भेट 2012 मध्ये 'फुकरे' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. रिपोर्ट्सनुसार, रिचानेच अलीला प्रपोज केले होते. रिचाच्या प्रपोजला उत्तर देण्यासाठी अलीला तीन महिने लागले होते. दोघांनीही त्यांचे नाते जवळपास 5 वर्षे जगापासून लपवून ठेवले होते. व्हिक्टोरिया और अब्दुलच्या वर्ल्ड प्रीमियरमध्ये दोघांनी त्यांच्या नाते ऑफिशिअल केले होते.

लग्नाचा विचार केला तर कोरोना वाढू लागतो - रिचा
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत रिचाला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना ती म्हणाली होती की, जेव्हा आम्ही लग्नाचे प्लॅनिंग करायचो तेव्हा कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढू लागायची. आम्ही 2020 मध्ये लग्न करायचा विचार केला होता, परंतु काही काळानंतर महामारी आली आणि लग्नाचा पूर्ण प्लान कॅन्सल करावा लागला. यानंतर आम्ही 2021 मध्ये प्लान केला, तर कोरोनाची दुसरी लाट आली होती.

रिचा आणि अली अनेक वेळा एकत्र दिसले.
रिचा आणि अली अनेक वेळा एकत्र दिसले.
बातम्या आणखी आहेत...