आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन घरात राहायला गेले अली-रिचा:लग्नापूर्वी अली फजलसह सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली रिचा चड्ढा, लॉकडाउनमध्ये एकदाही झाली नव्हती भेट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविड 19 मुळे लग्न लांबणीवर पडले.

अभिनेत्री रिचा चड्ढा बॉयफ्रेंड अली फजलसह नवीन घरात शिफ्ट झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, रिचा पूर्वी ज्या घरात राहात होती त्याची लीज मार्चमध्ये संपली होती. परंतु लॉकडाऊनमुळे ती नवीन घर शोधू शकत नव्हती. इतकेच नाही तर याकाळात रिचा एकदाही अलीला भेटू शकली नाही. मात्र अनलॉक सुरु होताच दोघांनी ऑगस्टमध्ये नवीन घर शोधायला सुरुवात केली आणि आता हे दोघेही त्यांच्या नवीन घरात राहायला गेले आहेत.

घरातून दिसतो समुद्र
एका मुलाखतीत रिचा म्हणाली की, नवीन घर मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. या घरामधून समुद्र दिसतो. आमचे नवीन घर हे वांद्रे आणि अंधेरीपासून लांब आहे, ज्यामुळे आम्ही पैपराजीच्या नजरेपासूनही दूर राहू.

मुंबई मिररशी झालेल्या संभाषणात रिचानेने अलीचे वर्णन मजेदार हाऊसमेट म्हणून केले आहे. ती म्हणते, "तो मजेदार आहे आणि इतर मुलांपेक्षा वेगळा आहे. प्रत्येक कामात तो मला मदत करतो. सुदैवाने आमच्या आवडीनिवडी सारख्या आहेत. कोणती साबण विकत घ्यायची किंवा घरात कोणती मोलकरणी ठेवायची, याचा निर्णय आम्ही एकत्र घेतो."

कोविड 19 मुळे लग्न होऊ शकले नाही
रिचा आणि अली यावर्षी एप्रिलमध्ये लग्न करणार होते. पण कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर त्यांना आपले लग्न पुढे ढकलावे लागले. अली फजलने एका ऑनलाइन मुलाखतीत याविषयी त्याचे मत व्यक्त केले होते. तो म्हणाला होता, ''खरं तर लग्नाविषयी आमच्या दोघांमध्ये बरेच समज-गैरसमज होते. आम्ही दोघंदेखील लग्नाच्या निर्णयावर ठाम नव्हतो. त्यामुळे आम्ही लग्नासाठी कोणता हॉलही बुक केला नव्हता आणि लग्नाच्या पत्रिकाही छापल्या नव्हत्या. त्यामुळे बरे झाले निदान आमचे पैसे तरी वाचले. मला बाहेर फिरायला आवडते त्यामुळे मी सतत बाहेर असतो याचकारणास्तव माझ्याकडे लग्नासाठी फारसा वेळही नव्हता. त्यामुळे बऱ्याच वेळा मला घरातल्यांचा ओरडाही खावा लागला. रिचा मला बऱ्याच वेळा सांगायची की लग्न आहे ,त्यामुळे लग्नाच्या तयारीकडे जरा लक्ष दे.''

2013 साली प्रदर्शित झालेल्या ‘फुकरे’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची पहिली भेट झाली होती. तेव्हापासूनच दोघांच्या रिलेशनशिपबाबतच्या चर्चा रंगू लागल्या.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser