आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रेलर रिलीज:रिचा चड्ढा आणि पंकज त्रिपाठी स्टारर 'शकीला'चा ट्रेलर रिलीज, ख्रिसमसला थिएटरमध्ये दाखल होणार चित्रपट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 25 डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होतोय.

दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अॅडल्ट स्टार शकीला हिच्या आयुष्यावर बेतलेल्या 'शकीला' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री रिचा चड्ढाने शकीलाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात शकीलाच्या आयुष्यात आलेले चढउतार दाखवण्यात आले आहे. चित्रपटाचा ट्रेलर लक्ष वेधून घेणारा आहे. रिचासह पंकज त्रिपाठी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. इंद्रजीत लंकेश यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. येत्या 25 डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होतोय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'शकीला' हा चित्रपट हिंदीसह तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत 1000 स्क्रिन्सवर रिलीज होणार आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेले थिएटर आता सुरु झाले आहेत. थिएटर सुरु झाल्यानंतर रिलीज होणारा 'शकीला' हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी 'सुरज पे मंगल भारी' आणि 'इंदू की जवानी' हे चित्रपट रिलीज झाले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser