आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यू वेब सीरिज:'कँडी'मध्ये रिचा चड्ढा आणि रोनित रॉय शेअर करणार स्क्रिन, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ही थ्रिलर वेब सीरिज

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'कँडी' 2021 मध्‍ये प्रदर्शित होण्‍यास सज्‍ज आहे.

2020 हे वर्ष वेब विश्‍वातून सादर केल्या गेलेल्‍या कंटेंटच्‍या बाबतीत अद्वितीय राहिले आहे. 2020 मधील काही सर्वात मोठ्या शोजमध्‍ये वूट सिलेक्‍टच्‍या शोजचा देखील समावेश होता. 'असुर', 'दि गॉन गेम', 'क्रॅकडाऊन' या वेब सीरिजनंतर आता वूट सिलेक्‍टवर 'कँडी' ही नवीन सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'कँडी' या सीरिजमध्‍ये मादक पदार्थ, राजकारण, महत्वाकांक्षा व हत्‍या यांचे सुरेख मिश्रण असलेल्‍या कथा प्रेमळ व कपटी कारस्‍थानाला दाखवतात. पण या कारस्‍थानामागे हात असलेली व्‍यक्‍ती किंवा पशूबाबत कोणीच सांगू शकत नाही. डोंगराळ भागातील एका बोर्डिंग स्‍कूलभोवती गुंफण्यात आलेल्या 'कँडी'मध्‍ये अॅक्‍शन, रोमांच आणि अचंबित करणारे क्षण पाहायला मिळणार आहेत. रिचा चड्डा व रोनित रॉय यांची प्रमुख भूमिका असलेली सीरिज 'कँडी' निश्चितच प्रेक्षकांना रहस्‍यांचा उलगडा करण्‍याच्‍या रोमांचक प्रवासावर घेऊन जाईल.

याबाबत बोलताना रोनित रॉय म्‍हणाले, ''मी अनेक प्रतिभावान दिग्दर्शकांसोबत काम करण्‍याची संधी मिळाल्‍याने खूपच नशीबवान आहे. यामुळे मला भरपूर शिकण्‍यामध्‍ये मदत झाली आहे. डिजिटल मनोरंजन युगाच्‍या प्रारंभासह प्रत्‍येकासाठी चांगले काम आहे आणि अनेक लोक अत्‍यंत प्रेरणादायी व हृदयस्‍पर्शी काम उत्तमप्रकारे करत आहेत. माझ्या मते, अनेक संधी आहेत आणि या संधी वाढतच जातील. मला काही सर्वोत्तम ओटीटी शोजचा भाग असण्‍याचा अभिमान वाटतो. आता मी सीरिज 'कँडी'साठी काम सुरू करण्‍यास उत्‍सुक असून त्याची वाट पाहत आहे. माझी भूमिका जटिल व आव्‍हानात्‍मक आहे, ज्‍यामुळे संपूर्ण पटकथा अधिक रोमांचक बनते. माझा विश्‍वास आहे की, ही सीरिज एक रोमांचपूर्ण राइड असणार आहे आणि मी ही सीरिज तुमच्‍यासमोर सादर होण्‍यासाठी अत्‍यंत उत्सुक आहे.''

रिचा चड्डा म्‍हणाली, ''मला या पटकथेकडे आकर्षून घेतलेली बाब म्‍हणजे शोमधील माझ्या भूमिकेत असलेल्‍या विविध छटा. ही थ्रिलर/ सायकोलॉजिकल हॉरर शैली माझ्यासाठी नवीन आहे. सखोलता असलेल्‍या भूमिका साकारण्‍याकडे मी नेहमीच आकर्षून गेले आहे आणि ही अगदी परिपूर्ण संधी होती. अर्थातच, रोनित सारख्‍या प्रतिभावान कलाकारासोबत काम करणे अत्‍यंत उत्‍साहवर्धक आहे. मी पहिल्‍यांदाच त्‍याच्‍यासोबत, तसेच नकुल सहदेव, मनु रिषी चढ्डा यासारख्‍या सर्वोत्तम कलाकारांसोबत काम करत आहे. मी दिग्‍दर्शक आशिष शुक्‍ला यांच्यासोबत काम करण्‍यासाठी देखील अत्‍यंत उत्‍सुक आहे. ते माझ्या करिअरच्‍या सुरूवातीला इंडस्‍ट्रीमध्‍ये प्रथम भेटलेल्‍या काही व्यक्तींपैकी एक आहेत.''

रोनित रॉय व रिचा चड्डासोबत शोमध्‍ये मनु रिषी चढ्डा व नकुल सहदेव देखील प्रमुख भूमिकेत असणार आहेत. सीरिजचे दिग्‍दर्शन आशिष आर. शुक्‍ला यांनी केले असून ऑप्टिमिस्टिक्‍स एंटरटेन्‍मेंटची निर्मिती आहे.

बातम्या आणखी आहेत...