आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिचा चड्ढाने केला भारतीय लष्कराचा अपमान:गलवानसंदर्भात केले वादग्रस्त ट्विट, लोकांनी व्यक्त केला संताप

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाने सोशल मीडियावर एक वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटमधून तिने भारतीय लष्कराचा अपमान केला आहे. यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून रिचा चढ्ढावर नाराजी व्यक्त होत आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले होते की, 'पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज आहे. भारतीय सेना कुठल्याही कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत सरकार जो आदेश देईल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत,' असे द्विवेदी म्हणाले होते. या विधानाचा संदर्भ देत रिचा चड्ढाने ट्विटरवर 'गलवान हाय म्हणत आहे', असे ट्विट केले.

रिचाच्या वादग्रस्त ट्विटवर भडकले लोक
यानंतर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'अपमानजनक ट्विट. ते लवकर मागे घेतले पाहिजे, आमच्या सशस्त्र दलांचा अपमान करणे योग्य नाही,' असे म्हणत रिचाला धारेवर धरले. तर एका यूजरने लिहिले, 'गलवानमध्ये देशासाठी 20 वीर सैनिकांनी प्राणांची आहुती दिली. पण येथे एक अभिनेत्री लष्कराची चेष्ठा करत आहे.' ‘जवानों का मजाक उडाने वालों को यह देश और कुदरत कभी माफ नहीं करेगा’, असे ट्विट निर्माते अशोक पंडित यांनी केले आहे.

2020 मध्ये झाला होता गलवान संघर्ष
2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवानमध्ये चकमक झाली होती. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचे जवळपास 35-40 सैनिक मारले गेले होते. या संघर्षानंतर भारत आणि चीनदरम्यान अत्यंत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

बातम्या आणखी आहेत...