आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीचा हात:रिचा चड्ढा मुंबईत राहणा-या गरजू लोकांना देत आहे नोकरी, ट्रोल करणा-यांचीही घेतली शाळा

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या ट्विटनंतर काही लोकांनी रिचाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे हजारो लोकांनी मुंबईहून स्थलांतर केले आहे. बर्‍याच लोकांकडे काम नाहीये. कामाअभावी बरेच कलाकारदेखील चिंतीत आहेत. पण देशात अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाल्याने अभिनेत्री रिचा चड्ढाने ट्विटरच्या माध्यमातून गरजूंना नोकरीच्या ऑफर दिल्या आहेत. विशेषत: फक्त मुंबईकरांसाठी. यासाठी तिने ट्विटरवर एकामागून एक अनेक ट्विट्स केले आहेत.

  • ट्रोल करणा-यांना सुनावले बोल, म्हणाली - तुला जास्त गरज वाटतेय

या ट्विटनंतर काही लोकांनी रिचाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने ट्रोलर्सची शाळादेखील घेतली. एका ट्रोलरने म्हटले होते- मॅडम तुम्ही कुणाल कामरा आणि स्वरा भास्कर यांना नोकरीवर घेऊ शकता. याच्या प्रत्युत्तरात रिचा म्हणाली - त्यांना नोकरीची गरज नाही, पण तुला नक्कीच वाटतेय.

  • लॉकडाऊनमुळे लग्न पुढे ढकलले

रिचाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे म्हणजे तिचे लग्न अभिनेता अली फजलशी ठरले आहे. या दोघांचे यावर्षी एप्रिलमध्ये लग्न होणार होते. तिने नोंदणीकृत लग्नासाठी देखील अर्ज केला, परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन सुरु झाले आणि त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...