आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रोलिंगवर रिचाचे प्रत्युत्तर:ट्रोलर रिचा चड्ढाला म्हणाला - आमिर खानसारखे तुझेही लग्न टिकणार नाही, अभिनेत्रीने दिले चोख प्रत्युत्तर

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिचाने या ट्रोलरचा चांगलाच समाचार घेतला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा अलीकडेच ट्रोलिंगची शिकार झाली पण तिने योग्य उत्तर देत त्या ट्रोलरची बोलती बंद केली आहे. या ट्रोलरने रिचा आणि अली फजलच्या लग्नाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. रिचाने या ट्रोलरचा चांगलाच समाचार घेतला आहे.

ट्रोलरने काय लिहिले होते?
अलीकडेच रिचाने अलीसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहोता. यावर कॉमेंट करताना एका ट्रोलरने लिहिले की, तुमचा घटस्फोट कधी होतोय, ते सांगा. कारण आमिर खानसारखे तुमचे देखील लग्न फार काळ टिकणार नाही.

ट्रोलरला ऋचाचे उत्तर.
ट्रोलरला ऋचाचे उत्तर.

रिचाने काय उत्तर दिले?
रिचाने ट्रोलरला खडे बोल सुनावत म्हटले, सर्वेश, माझं सोड.. तुझ्यासारख्या भिकाऱ्याशी कुणी लग्न केले नाही, म्हणून वैतागला आहेस का? तुझ्या बाबतीत तर मुलीने हुंडा मागितला असावा? रुप नाही, अक्कल नाही आणि गरीब?, आईला गॅसवरून चुलीवर स्वंयंपाक करण्याची वेळ आली असेल. काकू तुम्हाला नमस्कार, मात्र तुम्ही अशा सैतानरुपी पुत्राला या जगात का आणलं? हा बेरोजगार फक्त सोशल मीडियावर आपलं तोंड उघडण्याचं धाडस करू शकतो,' असे म्हणत रिचाने या ट्रोलरची बोलती बंद केली आहे.

कोविड -19 मुळे लग्न होऊ शकले नाही

रिचा आणि अली गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्न करणार होते. परंतु कोविड -19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. . अली-रिचा या दोघांनीही यापूर्वी ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ चित्रपटात एकत्र काम केले होते. रिल लाईफ कपलची भूमिका करताना ते रिअल लाईफ कपल झाले आणि जवळजवळ सहा वषापासून ते एकमेकांना डेट करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...