आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भोली पंजाबन'चा मोठा आरोप:रिचा चड्ढाने लिहिले - सुशांतसाठी शोक दाखवणारे असे अनेक डायरेक्टरर्स आहेत, जे त्यांच्यासोबत रात्र घालवण्यास नकार दिल्यावर अभिनेत्री बदलतात 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्रीने ब्लॉगच्या माध्यमातून आपले मत मांडले आणि अनेक मुद्द्यांवर निशाणा साधला
  • ऋचाने लिहिले की, संपूर्ण इंडस्ट्री चांगल्या आणि वाईट वागणूक करणाऱ्या लोकांमध्ये विभागली आहे

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिज्मवर वाद सुरूच आहे. बरेच लोक यास विरोध करत आहेत आणि बरेच जण समर्थन करत आहेत. पण रिचा चड्ढा हिने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. यामुळे, ती सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर होती. आता अभिनेत्रीने ब्लॉगद्वारे आपला मुद्दा मांडला आहे. तसेच सुशांतसाठी शोक करणाऱ्या अनेक डायरेक्टर्सवर निशाणा साधला आहे. तिने लिहिले आहे की हे तेच लोक आहेत जेव्हा त्यांच्यासोबत एकत्र झोपायला तयार न झाल्याने ते अभिनेत्रीला चित्रपटातून काढून टाकतात.

रिचाने नाव न घेता लिहिले की, गेल्या महिन्यात अनेक दिग्दर्शक सांत्वन संदेश पाठवताना दिसले. यापैकी बर्‍याच जणांनी आपल्या सोबतच्या लोकांच्या फिल्म रिलीज होण्यापूर्वीच बर्बाद केल्या आहेत. तर ऐनवेळी अभिनेत्रीला केवळ यासाठी रिप्लेस केले कारण तिने त्याच्यासोबत रात्र घालवण्यास नकार दिला होता. अनेक जणांनी पुन्हा-पुन्हा भविष्यवाणी केली आहे की, याचे काहीच होणार नाही. अन्य लोकांचे भविष्य पाहणारे असे लोक शेवटी काहीच करु शकत नाही. तुम्ही देवता नाही. असेही तिने म्हटले आहे. 

साहिर लुधियानवी यांच्या शब्दांनी सुरू केला ब्लॉग 
रिचाने आपल्या ब्लॉगची सुरुवात साहिर लुधियानवीच्या शब्दांनी केली आहे 
तिने लिहिले की - 

यहां एक खिलौना है इंसान की हस्ती ये बस्ती है मुर्दा-परस्तों की बस्ती यहां पर तो जीवन से है मौत सस्ती ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है

साहिर लुधियानवीचे हे शब्द बर्‍याच दिवसांपासून माझ्या कानात गूंजत आहेत. नेपोटिझम बद्दल गप्पा मारल्या जात आहेत, तर एखाद्या मानसिक परिस्थितीशी झगडणाऱ्या व्यक्तीसाठी वातावरण कसे तयार करावे याबद्दल क्वचितच बोलले जात आहे. हे सर्व माझा एक जुना मित्र असलेल्या एका सुंदर अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर सुरू झाले होते.

बातम्या आणखी आहेत...