आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा लास वेगसमधील एमजीएम ग्रँड गार्डन एरिना येथे पार पडला. भारतीय वेळेनुसार सकाळी साडे पाच वाजता हा सोहळा रंगला. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. संगीतविश्वात काम करणाऱ्या कलाकारांना या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित केले जाते. 28 कॅटेगरीत हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय गायक आणि संगीतकाराचाही सन्मान झाला. रिकी केज हे त्यांचे नाव आहे. रिकी केज यांना त्यांच्या ‘डिव्हाइन टाइड्स’ या अल्बमसाठी ‘सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम’ या श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे रिकी यांनी दुस-यांदा ग्रॅमी पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे.
रिकी केज यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी या पुरस्कार सोहळ्याचा फोटो शेअर करत आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘आज आमच्या ‘डिव्हाइन टाइड्स’साठी मला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. माझ्यासोबत उभे असलेले दिग्गज @copelandmusic. माझा दुसरा ग्रॅमी आणि स्टीवर्टचा सहावा आहे, याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. माझ्या कामात सहकार्य करणाऱ्या, माझी गाणी ऐकणाऱ्या सर्वांचेच खूप आभार,’ असे रिकी यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर गेलेल्या रिकी यांनी हात जोडून नमस्कार करत सगळ्यांचे अभिवादन केले. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होतेये.
याआधी रिकी यांना 2015 मध्ये 'विंड्स ऑफ संसार' या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. रिकी केज यांच्या नावावर सर्वात तरुण भारतीय म्हणून ग्रॅमी पुरस्कार जिंकण्याचा विक्रम आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.