आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रॅमी पुरस्कार 2023 च्या विजेत्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार 6 फेब्रुवारी रोजी अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात जगभरातील गायक आणि संगीतकारांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यात भारतीय संगीतकार रिकी केज यांनी त्यांच्या करिअरमधील तिसरा ग्रॅमी पुरस्कार पटकावला. रिकी यांना त्यांच्या 'डिव्हाईन टाइड्स' या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्वतः रिकी यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
ड्रमर स्टीवर्ट कोपलँडसह पुरस्कार शेअर केला
रिकी यांनी हा पुरस्कार प्रसिद्ध ब्रिटिश रॉक बँड 'द पोलिस'चे ड्रमर स्टीवर्ट कोपलँडसोबत शेअर केला आहे. या अल्बममध्ये त्यांनी रिकीसोबत काम केले आहे. सर्वोत्कृष्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम श्रेणीत दोघांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
आपल्या पोस्टमध्ये रिकी यांनी लिहिले- 'मी माझा तिसरा ग्रॅमी अवॉर्ड जिंकला आहे. अत्यंत आनंदी आणि कृतज्ञ, मी हा पुरस्कार भारताला समर्पित करतो.'
2015 आणि 2022 मध्येही ग्रॅमी पुरस्कारावर कोरले होते नाव
2023 पूर्वीही रिकी यांना त्यांच्या म्युझिक अल्बमसाठी ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे. 2015 मध्ये त्यांनी 'विंड्स ऑफ संसारा' या अल्बमसाठी पहिल्यांदा हा पुरस्कार आपल्या नावी केला. त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी 'डिव्हाईन टाइड्स' या म्युझिकल अल्बमसाठी 'बेस्ट न्यू एज अल्बम'च्या श्रेणीमध्ये स्टीवर्ट कोपलँडसह ग्रॅमी जिंकला. 2023 मध्येही त्यांच्या या अल्बमला पुन्हा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.
30 देशांमध्ये 100 हून अधिक पुरस्कार जिंकले
रिकी केज यांनी जगभरातील 30 देशांमध्ये एकूण 100 हून अधिक पुरस्कार आपल्या नावी केले आहेत. रिकी यांना त्यांच्या कामासाठी युनायटेड नेशन्स ग्लोबल मानवतावादी कलाकार आणि भारताचे युवा आयकॉन म्हणून नामांकन मिळाले आहे. 2021 मध्ये रिलीज झालेल्या त्यांच्या प्रसिद्ध अल्बम 'डिव्हाईन टाइड्स'मध्ये 9 गाणी आणि आठ म्युझिक व्हिडिओंचा समावेश आहे.
कंगनाने रिकी केजे यांना दिल्या शुभेच्छा
अभिनेत्री कंगना रनोटने रिकी केजे यांच्या या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवर पोस्ट शेअर करत कंगनाने लिहिले- अभिनंदन सर. कंगना व्यतिरिक्त इंडस्ट्रीशी संबंधित अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनीही रिकी यांना त्यांच्या ग्रॅमी अवॉर्डसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.