आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन मेमरीज:रिद्धिमाने शेअर केल्या वडिलांच्या आठवणी, कधी कन्यादान करताना तर कधी नात समारासोबत खेळताना दिसले ऋषी कपूर 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऋषी यांचे वयाच्या 67 व्या वर्षी 30 एप्रिल रोजी निधन झाले.

अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनापासून त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर त्याच्याशी संबंधित आठवणी शेअर करत आहे. तिने अलीकडेच इंस्टाग्राम स्टोरीवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत ज्यात ऋषी वेगवेगळ्या प्रसंगी कुटुंबासमवेत दिसत आहेत. 

पहिले छायाचित्र रिद्धिमाच्या लग्नाचे आहे, ज्यात ऋषी तिचे कन्यादान करताना दिसत आहेत. रिद्धिमाने हे छायाचित्र शेअर करताना हृदयाची इमोजी तयार केली. दुसर्‍या छायाचित्रात कपूर कुटुंब लता मंगेशकर यांच्यासोबत दिसत आहे. ज्याला रिद्धिमाने गुड टाइम्सचे असे कॅप्शन दिले आहे.

तर तिसर्‍या छायाचित्रात ऋषी त्यांची नात आणि रिद्धिमाची मुलगी समारासोबत चष्मा लावून पोज देताना दिसत आहेत. चौथ्या छायाचित्रात चिमुकली समारा ऋषी यांच्या स्टँडीजवळ उभी असल्याचे दिसत आहे. पाचव्या छायाचित्रात नीतू आणि समारा एकत्र दिसत आहेत.

  • 30 एप्रिल रोजी झाले निधन

ऋषी यांचे वयाच्या 67 व्या वर्षी 30 एप्रिल रोजी निधन झाले. त्यांना रक्ताचा कर्करोग झाला होता. लॉकडाऊनमुळे रिद्धिमा दिल्लीहून मुंबईला अंत्यसंस्काराला पोहोचू शकली नव्हती. ती 2 एप्रिल रोजी बाय रोड मुंबईला पोहोचली. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून रिद्धिमाने आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला होता.  

बातम्या आणखी आहेत...