आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॉप स्टारचा नवीन वाद:रिहानाने टॉपलेस फोटोत गळ्यात घातले गणपतीचे पेेंडेंट, राम कदम म्हणाले - 'आता तरी राहुल गांधी आणि काँग्रेस रिहानाची मदत घेणे थांबवतील'

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिहानाने हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर केला जात आहे.

अलीकडेच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी पोस्ट शेअर करत चर्चेत आलेली आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना आता नव्या वादात अडकली आहे. तिने एका लग्झरी ​​​​​​ ब्रँडसाठी एक फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती टॉपलेस दिसतेय. या टॉपसेल फोटोमध्ये तिने गळ्यात भारतीयांचे आराध्य दैवत गणपतीचे पेंडेंट घातले आहे. अशा प्रकारचे फोटोशूट करताना गळ्यातील पेंडेंट पाहून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तिने हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर केला जात आहे.

दरम्यान भाजपा नेते राम कदम यांनी रिहानाच्या या फोटोवर आक्षेप घेतला आहे. ‘रिहानाने आमच्या हिंदू दैवताची खिल्ली उडवली आहे आणि हे फार चुकीचे कृत्य आहे. भारतीय संस्कृती विषयी रिहानाला काही ठाऊक नाही, तिला या संस्कृतीबद्दल आदर नाही हे स्पष्ट होत आहे. आता तरी आशा आहे की राहुल गांधी आणि इतर काही काँग्रेस नेते तिची मदत घेणे थांबवतील,’ असे ते म्हणाले आहेत.

काही सोशल मीडिया यूजर्सच्या कमेंट्स
रिहानाच्या पोस्टवर भाष्य करताना एका नेटक-याने लिहिले, "रिहाना आमच्या धर्माचा सौंदर्यासाठी वापर करणे थांबव. शांततेच्या शेवटी गणेश मूर्ती." आणखी एका नेटक-याने लिहिले, "हे इतके अपमानजनक आहे. आमचा धर्म तुझ्या सौंदर्यासाठी नाही."

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रिहानाने घेतले 18 कोटी रुपये?
रिहानाला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यासंदर्भात पोस्ट करण्यासाठी 2.5 मिलियन डॉलर म्हणजेच 18 कोटी रुपये दिले गेल्याची माहिती समोर आली होती. या संपूर्ण घटनेमागे कॅनडातील पोएटिक जस्टीस फाऊंडेशनचा हात असल्याचे सांगितले गेले होते.

रिहानाने शेतकरी आंदोलनावर अमेरिकेतील वृत्तवाहिनी सीएनएनचा हवाला देत, 'आपण भारतातील शेतकरी आंदोलनावर का बोलत नाही,' असा प्रश्न उपस्थित केला होता. या ट्विटला जवळपास 2 लाख लोकांनी रिट्विट केले होते. सद्यस्थितीत रिहानाचे ट्विटरवर 11 कोटी फॉलोवर्स आहेत.