आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषभ शेट्टीने काढली पुनीत राजकुमारची आठवण:म्हणाला – 'कांतारा'मध्ये केली होती शिवाची भूमिका ऑफर, बिझी शेड्युलमुळे दिला होता नकार

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'कांतारा' या दाक्षिणात्य चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रिलीज होऊन इतके दिवस उलटले तरी प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. ऋषभचा चित्रपट पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने सिनेमागृहात जात आहेत. दरम्यान ऋषभ शेट्टीने खुलासा केला की, त्याला या चित्रपटात दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार यांना कास्ट करायचे होते, परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे पुनीत या चित्रपटाचा भाग होऊ शकले नाहीत.

पुनीत या चित्रपटासाठी एक्साइटेड होते

इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना ऋषभ शेट्टी म्हणाले- 'मी अप्पू सरांना कांतारामध्ये शिवाची भूमिका ऑफर केली होती. जेव्हा मी त्यांना स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा ते कथा ऐकून खूप एक्साइटेड होते. त्यांना चित्रपटाशी संबंधित आणखी कथा जाणून घ्यायच्या होत्या. पण इतर प्रोजेक्टमध्ये बिझी असल्याने त्यांना कांतारामध्ये काम करता आले नाही. एके दिवशी पुनीत सरांनी मला फोन केला आणि सांगितले की मी त्यांच्याशिवाय हा चित्रपट सुरू करावा. तुम्ही माझी वाट पाहत असाल तर तुमचा हा चित्रपट यावर्षीही बनणार नाही, असे ते म्हणाले,' असे ऋषभ शेट्टीने सांगितले.

पुनीत यांचे ऐकून ऋषभने चित्रपटाला सुरुवात केली
पुनीत यांनी मन वळवल्यानंतर ऋषभ यांनी कांतारा चित्रपटाचे काम सुरू केले. या चित्रपटात ऋषभने स्वतः शिवाची भूमिका साकारली. पुनीत यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी 'बजरंगी 2'च्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये ऋषभ शेट्टी पोहोचला होता. जिथे ऋषभ त्यांच्याशी कांताराबद्दल बोलला होता. तो क्षण काळ आठवताना ऋषभ म्हणाला- 'अप्पू सरांनी मला समजावून सांगितले की, मी चित्रपटासाठी माझ्या व्हिजनशी तडजोड करू नये. मग मी त्याला चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो दाखवले, जे पाहून ते माझ्यासाठी खूप खुश झाले. फोटो पाहून ते म्हणाले होते की, ते माझा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.'

ऋषभने सांगितले, 'मला स्वतःलाच कांतारामध्ये शिवाची भूमिका करायची होती. पण त्याच दरम्यान मला पुनीत यांचे नाव सुचले. पुनीत माझ्यापेक्षा शिवाची भूमिका अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात हे माझ्या लक्षात आले. विशेषतः म्हशींच्या शर्यतीच्या दृश्यात ते अगदी परफेकक्ट असते. खरं तर माझ्या चित्रपटासाठी ते इतके एक्साइटेड असतील, अशी मला आशा नव्हती,' असे ऋषभ म्हणाला.

सँडलवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते पुनीत

पुनीत हे सँडलवूडमधील असे एक अभिनेते होते, ज्यांचे 14 चित्रपट जवळपास 100 दिवस थिएटरमध्ये यशस्वीरित्या चालले होते. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांपैकी पुनीत एक होते. पुनीतचे वडील राजकुमार हे देखील इंडस्ट्रीत मोठे नाव होते. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे ते कन्नड चित्रपटातील पहिले अभिनेते होते. पुनीत यांची मुलगी परदेशातून आल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. पुनीत कुमार यांचे गेल्यावर्षी 29 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

IMDb वर बेस्ट रेटिंग असलेला चित्रपट
'कांतारा' केवळ बॉक्स ऑफिसवरच कमाल करत नाहीये तर या चित्रपटाने IMDb रेटिंगमध्येही सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. IMDb वर 9.4 रेटिंगसह हा भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. यापूर्वी, IMDb रेटिंगमध्ये KGF 2 अव्वल होता.

बातम्या आणखी आहेत...