आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

  रिकॉल:ऋषी कपूर यांचे जिवलग मित्र राज बन्सल म्हणाले - कॅन्सरविषयी सांगताना त्यांना रडू कोसळले होते, बोलणेही पूर्ण करु शकले नव्हते 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्यांचा रडण्याचा आवाज मला येत होता. मला काहीतरी झालंय हे लक्षात आले.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल रोजी निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून ते ब्लड कॅन्सरशी लढा देत होते. 2018 मध्ये त्यांना कॅन्सरचे निदान झाल्याचे समजले होते.  आपल्याला कॅन्सर झाला आहे हे कळल्यानंतर ऋषी कपूर यांना खूप मोठा धक्का बसला होता. याविषयी त्यांनी त्यांचे जिवलग मित्र आणि फिल्म डिस्ट्रीब्युटर राज बन्सल यांना सांगताना रडू कोसळले होते. फोनवर बोलताना त्यांना आपले म्हणणेही पूर्ण करता आले नव्हते.

'ऋषी यांना रडू कोसळे होते, पाच मिनिटांनंतर कॉल करायला सांगितले होते' 

बन्सल यांनी एका मुलाखतीत सांगितले, “त्यांना 2018 मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. याबद्दल त्यांच्या कुटुंबाशिवाय इतर कोणालाही माहिती नव्हती. ही सप्टेंबर 2018 ची गोष्ट आहे. अमेरिकेत उपचारासाठी संध्याकाळी ते निघणार होते. त्यांनी मला त्याच दिवशी फोन केला. मला ते प्रेमाने ठाकूर म्हणायचे. मी फोन घेतला आणि बोलण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी मला, 'ठाकूर तुझ्याशी बोलायचं आहे' असे सांगितले आणि गप्प बसले. त्यांचा रडण्याचा आवाज मला येत होता. मला काहीतरी झालंय हे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मला पाच मिनिटांनी फोन कर सांगितले.'

'फोनवर म्हणाले होते - ठाकूर चांगली बातमी नाही'

बन्सल पुढे म्हणाले - 'मी बरोबर पाच मिनिटांनी फोन लावला आणि चिंटू सगळे काही ठीक आहे ना, असे विचारले. ते पुन्हा रडू लागले. ठाकूर चांगली बातमी नाहीये. मला कॅन्सर झाला आहे. उपचारासाठी मी अमेरिकेला जात आहे असे त्यांनी सांगितले.' 

बंगल्यातून फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले होते ऋषी 

बन्सल यांनी सांगितल्यानुसार, "रुग्णालयात दाखल होण्याच्या दोन दिवसांपूूर्वी माझे त्यांच्याशी बोलणे झाले होते. ते फ्लॅटबाहेर  चालत होते. मला आठवतंय मी त्यांना घरात जाण्यासाठी सांगितले होते. त्यावर ते म्हणाले होते - यार राजू आता बंगल्यात रिनोव्हेशनचे काम सुरु आहे. फ्लॅटमध्ये शिफ्ट झालोय. चांगली हवा घेण्यासाठी बाहेर आलोय, असे त्यांनी सांगितले होते.'

बन्सल म्हणाले, 'आम्ही फ्यूचर प्लान, कोरोना आणि लॉकडाऊन याविषयी चर्चा केली. खरं तर आम्ही फोनवर जास्त बोलायचो नाही. पण त्यादिवशी आम्ही अर्धा तासाहून अधिक वेळ बोललो. त्यामुळे ते आता नाहीत, यावर माझा विश्वास बसत नाहीये.'  ऋषी कपूर यांचे निधन झाले त्याच्या आदल्या दिवशीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते का? असे विचारले असता त्यांनी सांगितलं की, नाही… मीडियात हे चुकीचे वृत्त आहे. त्यांना दहा दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करम्यात आले होते. 

तीन दशके जुनी होती बन्सल आणि ऋषी यांची मैत्री 

बन्सल यांनी काही दिवसांपूर्वी भास्करला दिलेल्या मुलाखतीत सांगतले होते की, ऋषी आणि त्यांची मैत्री 30 वर्षांपूर्वी चांदनी चित्रपटाच्या सेटवर झाली होती. शूटिंग दिल्लीत सुरु होती. चित्रपटाचे दिग्दर्शक यश चोप्रा त्यांचे फॅमिली फ्रेंड होते. त्यांनी बन्सल यांना सेटवर बोलावले होते आणि ऋषी यांच्याशी ओळख करुन दिली होती. चोप्रा यांनी ऋषी यांना सांगितले होते की, हे जयपूरहून आले असून आपले डिस्ट्रीब्युटर आहेत.

बन्सल यांनी सांगितले होते, ऋषी फ्रेंडली नेचर होते, त्यामुळे आमच्यात मैत्री झाली. जेव्हा मी जयपूरला परतत होतो, तेव्हा ते मला म्हणाले, थांबा मीसुद्धा तुमच्यासोबत उद्या येतो. जयपूरमध्ये त्यांच्या अजूबाचे चित्रीकरण होणार होते. ऋषी आणि बन्सल जयपूरला सोबतच पोहोचले. येथे आल्यानंतर ऋषी बन्सल यांच्या एक महिन्याच्या मुलाला भेटले होते. त्यानंतर मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला कुटुंबासोबत आले होते. 2016 मध्ये बन्सल यांच्या मुलाच्या लग्नातही ऋषी पत्नी नीतूसोबत जयपूरमध्ये सहभागी झाले होते.   

बातम्या आणखी आहेत...