आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऋषी कपूर यांची पहिली पुण्यतिथी:ऋषी यांची को-स्टार जूही चावला सांगितले - 'रेडिओवर गाणे ऐकत मेकअप करत असत'

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेते ऋषी कपूर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या सहकलाकारांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितल्या आठवणी...

ऋषी कपूर यांना या जगाचा निरोप घेऊन आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. 30 एप्रिल 2020 रोजी ल्यूकेमियामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. ऋषी यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांची को-स्टार जुही चावला आणि अभिनेते रजा मुराद यांनी त्यांच्याविषयीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. जुहीने सांगितले की, ऋषी दररोज दोन शिफ्टमध्ये काम करायचे. परंतु शूटसाठी कधीच उशीरा सेटवर आले नाहीत. शेवटच्या वर्षांतही ऋषी यांच्यात एवढी ऊर्जा होती की ते रात्री उशिरापर्यंत शूटिंग करूनही कधी दमायचे नाहीत. ऋषी यांच्याबद्दल या कलाकारांनी काय सांगितले, ते त्यांच्याच शब्दात...

  • 'पहिल्यांदा मी खूप घाबरले होते'
जुही चावला - अनेक चित्रपटांत सहकलाकार असलेली अभिनेत्री
जुही चावला - अनेक चित्रपटांत सहकलाकार असलेली अभिनेत्री

'माझ्या पहिल्या ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटानंतर मी त्यांच्यासोबत ‘घर घर की कहानी’ चित्रपट केला होता. त्या वेळी मी खूपच घाबरले होते. ते रोज दोन शिफ्टमध्ये काम करत. वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये शूट करण्यासाठी जात असत. मात्र कधीच त्यांना उशीर होत नव्हता. त्यांच्या काही सवयी खूपच वेगळ्या होत्या. ते सकाळी दहा वाजता सेटवर जात आणि कोणत्याही झाडाखाली बसत. तेथे शशीदादा त्यांचा मेकअप करत. त्या वेळी ते रेडिओवर गाणे ऐकत असत. शशीदादा जेव्हा मेकअप पूर्ण करायचे तेव्हा चिंटूही उठायचे आणि चेहऱ्यावर हात फिरवत आणि पूर्ण मेकअप हातानेच बिघडवून टाकत. त्यानंतर केसांवर हात मारत 'आता मी रेडी झालो’ असे म्हणत.'

  • दृश्यात इतके मग्न झाले की, हाताला लागले तरी त्यांना कळले नाही
अभिनेते रझा मुराद - मित्र आणि अनेक चित्रपटांतील सहकलाकार
अभिनेते रझा मुराद - मित्र आणि अनेक चित्रपटांतील सहकलाकार

'ऋषीसाहेबांचे त्यांच्या वडिलांसोबत खूपच फॉर्मल रिलेशनशिप होते. रात्री जेव्हा आमची मैफल सजायची तेव्हा राजसाहेब आमच्यापासून खूप दूर जाऊन बसायचे. मात्र या गोष्टीचा कामावर कधीच परिणाम जाणवला नाही. कॅमेरा ऑन होताच चिंटूजी अभिनयात बुडून जायचे. चित्रपट 'प्रेमरोग’मध्ये ऋषी एक दृश्य करत होते त्यासाठी राजसाहेब त्यांना म्हणाले, चिंटूबाबा, मला या दृश्यात दिलीपकुमारसारखी इंटेन्सिटी हवी आहे. त्यानंतर चिंटूबाबा त्या दृश्यात इतके बुडाले की त्यांच्या हातातून रक्त निघाले तरी त्यांना कळले नाही. त्यानंतर पटकन सेटवर डॉक्टरला बोलावण्यात आले. त्यांच्या हाताला दोन टाके लागले.'

बातम्या आणखी आहेत...