आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेते ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल रोजी वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. गेल्या दीड वर्षांपासून ते ल्युकेमिया (ब्लड कॅन्सर) या आजाराशी लढा देत होते. 11 महिने अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते. दरम्यान त्यांची प्रकृती सुधारत असल्याने त्यांनी चित्रपटात कमबॅक करण्याचा निर्णय घेतला आणि दोन चित्रपटही साइन केले होते. यापैकी एक चित्रपट आहे 'शर्माजी नमकीन' आणि दुसरा आहे 'द इंटर्न'. 'द इंटर्न' या चित्रपटाची फक्त घोषणा झाली होती, शूटिंग सुरु झाले नव्हते. मात्र 'शर्माजी नमकीन' या चित्रपट फ्लोअरवर आला होता.
मुख्य भूमिकेत झळकणार ऋषी : ऋषी यांचा शेवटचा चित्रपट ‘शर्माजी नमकीन’ आता रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर पूर्ण करतील. उपचार घेऊन परतल्यानंतर ऋषी कपूर यांनी या चित्रपटाचे शूटिंग केले होते. शूटिंग जवळजवळ पूर्ण झाले होते मात्र त्यांची तब्येत बिघडल्यामुळे चित्रपटाचे काम थांबले होते. आता हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरणार आहे. यात त्यांच्यासोबत जुही चावलादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रितेश आणि फरहान याचे राहिलेले काम पूर्ण करणार आहेत. हनी त्रेहान सांगतात, उपचाराच्यावेळी ऋषीजी म्हणाले होते, जे काही झाले ते वैयक्तिक आहे, चित्रपट पूर्ण करणे माझी जबाबदारी आहे, ती मी पूर्ण करेन. शो मस्ट गो ऑन.’
जुही चावलाने या चित्रपटाच्या सेटवरील काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती. यात ऋषी यांच्यासह इतर कलाकार स्क्रिप्ट रिडिंग सेशनमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. हितेश भाटिया या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर एक्सेल एंटरटेन्मेंटसोबत हनी त्रेहान आणि अभिषेक चौबे निर्माते आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.