आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:बाणगंगा तलावात झाले ऋषी कपूर यांच्या अस्थींचे विसर्जन, लॉकडाऊनमुळे हरिद्वारला जाण्याची मिळाली नाही परवानगी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या दुःखाच्या काळात आलिया रणबीरच्या सोबत आहे.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या अस्थींचे रविवारी विसर्जन करण्यात आले. यासाठी त्यांचा मुलगा रणबीर, पत्नी नीतू आणि मुलगी रिद्धिमा यांच्यासह चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि अभिनेत्री आलिया भट मलबार हिल (मुंबई) येथील बाणगंगा या प्राचीन तलावावर पोहोचले होते. विधीवत ऋषीं यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी सर्वजण लॉकडाऊनच्या प्रोटोकॉलचे पालन करताना दिसले. प्रत्येकाने तोंडावर मास्क लावला होता.

हरिद्वारला जाण्याची परवानगी मिळाली नाही

ऋषी यांचे थोरले बंधू रणधीर कपूर यांनी एका बातचीतमध्ये सांगितले की, "आम्ही काल (शनिवारी) ऋषींची प्रार्थना सभा घेतली आणि आज (रविवारी) बाणगंगामध्ये त्यांच्या अस्थींचे विसर्जन केले. कारण आम्हाला लॉकडाऊनमुळे अधिका-यांकडून हरिद्वारला जाण्याची परवानगी मिळाली नाही."  

67 वर्षीय ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल रोजी मुंबईच्या एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या दीड वर्षांपासून ल्युकोमाशी (ब्लड कॅन्सर) झुंज देत होते.

कुटुंबातील 5-6. सदस्यांसह प्रार्थना बैठक

शनिवारी ऋषी कपूर यांच्यासाठी त्यांच्या पाली हिल स्थित राहत्या घरी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुासर, म्हणण्यानुसार कुटुंबातील केवळ 5 ते 6 सदस्यांनी यात हजेरी लावली. शनिवारी रात्री ऋषी यांची मुलगी रिद्धिमा देखील मुलगी समारासोबत मुंबईत पोहोचली होती. लॉकडाऊनमुळे तिला आपल्या वडिलांचे अंत्यदर्शन घेता आले नव्हते. दिल्लीहून रोड प्रवास करत 30 तासांनी ती मुंबईत दाखल झाली. रिद्धिमाने व्हिडिओ कॉलद्वारे वडिलांना अंतिम निरोप दिला होता.

बातम्या आणखी आहेत...