आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Rising Budget, Profit Opportunities And Increasing Fanbase Of Stars, Making Films In Multiple Languages Simultaneously Is The New Trend Of The Industry.

मल्टी-लँग्वेज चित्रपटांचे युग:वाढते बजेट, नफ्याच्या संधी आणि स्टार्सचे वाढते फॅनबेस, एकाच वेळी अनेक भाषांमध्ये चित्रपट बनवणे हा आता इंडस्ट्रीता नवा ट्रेंड

हिरेन अंतानी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मल्टी-लँग्वेज चित्रपटांमुळे व्हॉईस ओव्हर आर्टिस्टसाठी बाजारपेठ वाढत आहे.
  • अ‍ॅक्शन किंवा पीरियड ड्रामाचा कंटेंट, स्टार मिक्स अपमुळे उत्तर-दक्षिणेतील अंतर आता कमी होत आहे.

चित्रपटांचा प्रसार आणि प्रचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता मल्टी लँग्वेज चित्रपटांचा काळ आला आहे. उत्तर आणि दक्षिणेतील कलाकार एकत्र येऊन आता अनेक भाषांमध्ये चित्रपट बनवत आहेत. म्हणजेच उत्तर-दक्षिणेतील अंतर आता कमी होत आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे चित्रपटांच्या कमाईची व्याप्ती वाढवणे. चित्रपटांचे बजेट वाढू लागले आहे, नफा वाढवण्यासाठी हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही चित्रपट तयार केले जात आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त नफा एकाच वेळी मिळवता येईल.

एकाहून अधिक भाषांमध्ये सध्या तयार होत असलेले चित्रपट

चित्रपटभाषाबजेट (कोटींमध्ये)स्टार कास्ट
आरआरआरतेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी400एनटीआर ज्युनिअर, अजय देवगण, रामचरण तेजा, आलिया भट्ट
आदिपुरुषतेलुगु, तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम500प्रभास, सैफ अली खान, कृती सेनन
थलायवीतमिळ, तेलुगु, हिंदी65कंगना रनोट, अरविंद स्वामी, नासिर
राधे-श्यामतेलुगु, हिंदी, तमिळ350प्रभास, पुजा हेगडे
हाथी मेरे साथतमिळमध्ये 'कदान'या नावाने तेलुगुमध्ये 'आरण्य' या नावाने आणि हिंदीत 'हाथी मेरे साथी'60तमिळ आणि तेलुगु मध्ये विष्णु विशाल
आणि हिंदीत पुलकित सम्राट, राणा डगुबती
केजीएफ 2तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, हिंदी100यश, संजय दत्त, रवीना टंडन
मडीतमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड हिंदी30युआन, रिधान कृष्णा, सुरेश अनुषा
----
----
----

रणनीती काय ?
तमिळ चित्रपटांचे प्रख्यात निर्माता आणि चित्रपट वितरक एस.आर. प्रभू म्हणाले की, आमची रणनीतीही अगदी सोपी आहे. आम्ही चित्रपटाची कास्ट मिक्सअप करतो, म्हणजे काही पात्र दक्षिण कलाकार करतील तर काही पात्रांसाठी हिंदी कलाकारांना साइन केले जाते. काही चित्रपटांमध्ये हिंदी निर्माते आणि दक्षिणेतील दिग्दर्शक असेही मिक्सअप केले जाते.

प्रभू सांगतात की, दक्षिण आणि उत्तर चित्रपटांची टेस्ट वेगळी आहे. त्यामुळे बहुतेक बहुभाषिक चित्रपट एकतर सुपरहीरो किंवा पीरियड चित्रपटांवर आधारित असतात. संपूर्ण भारतात हिट होतील, असे चित्रपट सतत बनवत राहणे कठीण आहे. ही प्रक्रिया दीर्घ काळ चालेली, अशी मला आशा आहे.

या नवीन ट्रेंडचा कलाकारांना फायदाच होतोय. हिंदीतील स्टार्सचा दक्षिणेत तर दक्षिणेतील स्टार्सचा हिंदीत चाहता वर्ग वाढेल. सोबतच त्यांची एंडोर्समेंटची कमाईदेखील वाढेल.

सर्व अधिकारांची आगाऊ पूर्तता करावी लागेल
निर्मात्यांसाठी डबिंग राइट्स किंवा रिमेकचे हक्क हा अतिरिक्त बोनस आहे, परंतु बहुभाषिक चित्रपटात त्यांना या अधिकारांची आगाऊ पुर्तता करावी लागले. याचा योग्य फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला योग्य वेळी योग्य चित्रपटात गुंतवणूक करावी लागेल.

बाहुबलीने मार्ग दाखवला, चित्रपटांची व्याप्ती वाढवली
तमिळ आणि तेलुगू इंडस्ट्रीतील व्यापार विश्लेषक रमेश बाला म्हणाले की, बाहुबली (1 आणि 2) च्या यशामुळे दक्षिणेतील निर्मात्यांना हे जाणवले की एकाच वेळी हिंदीमध्ये चित्रपट रिलीज केल्याने मोठा फायदा होतो. तसे पाहता, दक्षिण आणि उत्तर चित्रपटांची प्रेक्षकांची टेस्ट वेगळी आहे. उत्तरेत आयुष्मान खुरानाचे मल्टिप्लेक्स जोनरचे चित्रपट चालतील, पण दक्षिणेत सिंगल स्क्रीनसुद्धा हाऊसफुल होईल, असा नायक हवा असतो.

अ‍ॅक्शनची एक सार्वत्रिक अपील आहे. यूपी-बिहारच्या छोट्या शहरांमध्ये अ‍ॅक्शन चित्रपट चालतात. म्हणूनच बहुतेक बहुभाषिक चित्रपट हे अ‍ॅक्शन ओरिएंटेड असतात.

सदमा-रोज आणि आताच्या काळात काय फरक आहे?
रमेश बाला सांगतात की, सदमा, रोजा, अप्पू राजा असे चित्रपट प्रत्यक्षात फक्त दक्षिणेसाठीच तयार केले गेले होते. तिथे हिट झाल्यानंतर हिंदीमध्ये या चित्रपटांना डब करण्यात आले. आता मात्र प्रोजेक्टची घोषणा करतानाच चित्रपट हिंदीसह तीन किंवा पाच भाषेत प्रदर्शित होईल, हे सांगितले जात आहे.

दाक्षिणात्य हीरो आता संपूर्ण देशाचा स्टार आहे
प्रख्यात लेखक-गीतकार आणि आता हॉलिवूड चित्रपटांच्या हिंदी रूपांतरणात अव्वल स्थानी असलेले मयूर पुरी सांगतात की, यापूर्वी डबिंगच्या गुणवत्तेवर लक्ष नव्हते. आता 'जंगल बुक' सारख्या हॉलिवूड चित्रपटासाठी उच्च-स्तरीय व्हॉईस कलाकारांची निवड करण्यात आली होती. डबिंगमधील संवादांच्या गुणवत्तेवर आणि स्थानिकीकरणावर बरेच लक्ष केंद्रित केले गेले आहे. आता सर्वांना समजले आहे की जर इतर भाषांमध्ये मार्केट वाढवायचे असेल तर दर्जेदार डबिंग करणे आवश्यक आहे.

डबिंगच्या तुलनेत सब टायटलिंगमध्ये खर्च कमी येतो. परंतु बर्‍याच लोकांना चित्रपट बघताना त्याखाली येणारा मजकूर वाचायला आवडत नाही. दुसरीकडे, डबिंगची वाढता खर्च वाढत्या बाजारपेठेपुढे काहीच नाही.

व्हॉईस अ‍ॅक्टिंग कलेला मान मिळाला
हिंदीतील ‘हॅरी पॉटर’ला आपला आवाज देणारे व्हॉईस आर्टिस्ट राजेश कावा म्हणतात की, बहुभाषिक चित्रपटांमुळे व्हॉईस अ‍ॅक्टिंग कलेला मान मिळाला, जो सुरुवातीला मिळत नव्हता.

आता बहुभाषिक चित्रपटांमध्ये, काही हिंदी आणि काही दाक्षिणात्य कलाकारांच्या मिक्सअपमुळे प्रत्येक भाषेतील व्हॉईस अ‍ॅक्टरला फायदा मिळतोय. जसे हिंदी व्हॉईस अ‍ॅक्टर एखाद्या तामिळ किंवा तेलुगु सुपरस्टारला आवाज देतील, तर तेथील व्हॉईस आर्टिस्ट अक्षय कुमार किंवा अन्य हिंदी अभिनेत्याचा आवाज होईल.

प्रभासने आता हिंदीचे धडे गिरवले आहेत, त्यामुळे तो स्वतः हिंदी डबिंग करण्यास प्राधान्य देतो, पण बाकी स्टार्समुळे डबिंग आर्टिस्टसाठी संधी उपलब्ध झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...