आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आज 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. यंदाचा रितेशचा वाढदिवस खूप स्पेशल आहे. कारण याचवर्षी त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. याशिवाय त्याची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख ही देखील मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. रितेशने दिग्दर्शित केलेल्या वेड या चित्रपटातून जिनिलीया मोठ्या पडद्यावर कमबॅक करतेय. या चित्रपटातून रितेश ब-याच वर्षांनी आपल्या पत्नीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. दोघांच्या ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीच्या प्रेमात त्यांचे चाहते आहेतच पण आता त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री बघण्यासही प्रेक्षक खूपच आतूर आहेत.
तसे पाहता रितेश आणि जिनिलीया दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. दोघे कायम मजेशीर रील्स शेअर करत असतात. आज रितेशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहुयात दोघांच्या सुंदर क्षणांवर एक नजर टाकुया...
जिनिलीया आणि रितेश कायम एकमेकांसोबतचे रील्स शेअर करत असतात. अशाच एखा रीलमध्ये जिनिलीया रितेशला एक जोक सांगतेय. "एक जोडपं असतं, आणि बायको खूपच शांत स्वभावाची असते," असे जिनिलीया सांगत असतानाच रितेश जोरजोरात हसायला लागतो. पण जिनिलीयाचा चिडलेला लूक पाहता आपण चुकीच्या ठिकाणी हसलो, याची जाणीव त्याला होते आणि तो शांत होतो. दोघांचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला.
दिवाळीच्या दिवशीही रितेश आणि जिनिलीयाने व्यायामापासून सुटी घेतली नव्हती. दोघांनी जिममध्ये भरपूर घाम गाळला. एका व्हिडिओत रितेश घाम गाळताना तर जिनिलीया मात्र धमाल करताना दिसतेय.
रितेश आणि जिनिलीया एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत असतात. दोघांचा समुद्रकिना-यावरील हा व्हिडिओदेखील चाहत्यांना खूप आवडला.
'जब अपनी ही बिवी से प्यार हो जाये तो समज जाओ बुढापा आ गया है...' असे म्हणत रितेशने जिनिलीयासोबतचा हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला.
या व्हिडिओला रितेशने चल चल चल असे कॅप्शन दिले. जिनिलीयासोबतचा मॉर्निंग वॉक दरम्याचा हा व्हिडिओ रितेशने शेअर केला.
रितेश आणि जिनिलीया हे बॉलिवूडमधील क्यूट कपल आहे. दोघांचे सुंदर बाँडिंग दाखवणा-या या व्हिडिओंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.