आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेश-जिनिलियाची नवीन कार:गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कपलने खरेदी केली 1.16 कोटी रुपयांची इलेक्ट्रिक कार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे बी-टाऊनमधील लोकप्रिय जोडपे आहेत. अलीकडेच हे दोघे अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या घरी गणपतीच्या सेलिब्रेशनमध्ये दिसले होते. यावेळी रितेश एका नवीन BMW iX लक्झरी कारमधून अर्पिताच्या घरी दाखल झाला होता. ही एक इलेक्ट्रिक कार आहे.

1.16 कोटी रुपये आहे रितेशच्या कारची किंमत

रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याची ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. या कारची किंमत सुमारे 1.16 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. मुंबईत या कारची ऑन-रोड किंमत सुमारे 1.43 कोटी रुपये आहे. रितेशला कारची आवड आहे. यामुळे त्याच्याकडे अनेक आलिशान लग्झरी गाड्या आहेत. यापूर्वी 2017 मध्ये जिनिलियाने रितेशला त्याच्या वाढदिवशी टेस्ला मॉडेल X कार गिफ्ट केली होती.

रितेशला लग्झरी गाड्यांची आवड
रितेशच्या कारच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे अनेक गाड्या आहेत. बेंटले फ्लाइंग स्पर त्याच्या कलेक्शनमध्ये असून त्याची किंमत 3.5 कोटी आहे. शिवाय त्याच्याकडे 2 कोटी रुपये किंमतीची लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग, 1.4 कोटींची BMW 7- सिरीज, 1.3 कोटींची मर्सिडीज-बेंझ एस-क्लास आणि 95 लाखांची टेस्ला एक्स ही कार आहे.

लग्नापूर्वी दोघांनी 10 वर्षे एकमेकांना केले होते डेट
जिनिलिया आणि रितेश हे बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या कपल्सपैकी एक आहेत. 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघे लग्नबंधनात अडकले. दोघांनी 2003 मध्ये आलेल्या 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे प्रेमात पडले आणि जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. या जोडप्याला दोन मुलं आहेत. मोठा मुलगा रियानचा जन्म 25 नोव्हेंबर 2014 रोजी झाला तर धाकटा मुलगा राहिलचा जन्म 1 जून 2016 रोजी झाला.

बातम्या आणखी आहेत...