आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:85 वर्षीय व्हायरल आजीने चित्रपटात केले आहे काम; मदतीसाठी पुढे सरसावला अभिनेता रितेश देशमुख

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजींचा लाठ्याकाठ्या फिरतवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते आहे

पुण्यात सुरू असलेल्या लॉकडाउनदरम्यान गुरुवारी एका आजींचा रस्त्यावर लाठ्या फिरवतानाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्या काठ्यांचा खेळ सादर करत असल्याचे व्हिडीओमध्ये सांगितले जात आहे. 85 वर्षीय आजींचे नाव शांताबाई पवार असून, त्या पुण्यातील हडपसर परिसरात आपल्या कुटुंबासह राहतात. या वयातही ज्या सफाईने काठी चालवताना पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या आजींनी बॉलिवूडमध्ये सहकलाकाराच्या भूमिका केल्या आहे. त्यांनी 'गीता और सीता' आणि 'शेरनी'सारख्या हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या लाठ्या फिरवतानाचा व्हिडिओ कोणीतरी आपल्या मोबाइलमध्ये शूट करुन इंटरनेटवर अपलोड केला. काही वेळेतच आजी इंटरनेटवर व्हायरल झाल्या. 

मदतीसाठी पुढे आला रितेश देखमुख

शांताबाई पवार या आजींचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख आजींच्या मदतीसाठी पुढे आला. रितेशने आपल्या अकाउंटवरुन व्हिडियो शेअर करुन, "कृपया कोणीतरी मला या आजींशी संपर्क करुन द्या," असे ट्वीट केले. त्यानंतर दुसरे ट्वीटर करुन संपर्का झाल्याचे सांगितले.

अभिनेता रितेश देशमुखचे ट्वीट ...