आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिलासा:रितेश देशमुखने ट्विट करुन सांगितले - 'निशिकांत कामत यांचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरु आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करा'; मिलाप झावेरी यांनी ट्विट करुन दिली होती निधनाची बातमी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारी सकाळी निशिकांत कामत यांचे निधन झाल्याची बातमी आली होती.

प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे आज निधन झाल्याची बातमी दिग्दर्शक मिलाप झावेरी यांनी ट्विट करुन दिली होती. त्यामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. मात्र ही बातमी चुकीची असून निशिकांत कामत आपल्यातच आहे, मात्र त्यांचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरु आहे. ते व्हेटिंलेटरवर असून त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असे अभिनेता रितेश देशमुखने सांगितले आहे.

  • दिग्दर्शक मिलाप झावेरी यांनी चुक सुधारली

मिलाप झावेरी यांनी निशिकांत कामत यांच्या निधनाचे ट्विट केल्यानंतर काही मिनिटांतच दुसरे ट्विट करुन माझे निशिकांत कामत यांच्या निकटवर्तीयांशी नुकतेच बोलणे झाले असून ते आपल्यातच आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरु आहे, असे सांगितले आहे.

50 वर्षीय कामत यांना काविळ आणि पोटदुखीच्या त्रासामुळे 31 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

  • 2005 मध्ये दिग्दर्शनात केले पदार्पण

निशिकांत कामत यांनी 2005 साली 'डोंबिवली फास्ट' या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट त्यावर्षीच्या हिट मराठी चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

  • दृष्यमद्वारे मिळाली प्रसिद्धी

मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या निशिकांत यांनी कमी वेळातच हिंदी सिनेसृष्टीत आपला जम बसवला. 'दृश्यम', 'मुंबई मेरी जान', 'मदारी', 'फोर्स' हे त्यांचे चित्रपट हिट ठरले. 2015 मध्ये आलेल्या दृष्यम या चित्रपटाद्वारे त्यांना लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू आणि श्रेया सरन यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. मराठीतही त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'डोंबिवली फास्ट'सह रितेश देशमुख स्टारर 'लय भारी', स्वप्निल जोशी-सुबोध भावे स्टारर 'फुगे' हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले आहेत.

  • अनेक चित्रपटांमध्ये केला अभिनय

दिग्दर्शनाबरोबरच निशिकांत यांनी अभिनयातही आपणी चुणूक दाखवली आहे. 'सातच्या आत घरात' (मराठी), 'रॉकी हॅण्डसम', '404 एरर नॉट फाऊंड', 'जुली-2', 'भावेश जोशी' या चित्रपटात त्यांनी अभिनय केला. यापैकी 2016 मध्ये आलेल्या रॉकी हँडसम या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.

0