आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Rhea Chakraborty Byculla Jail 6th Day Update | Sushant Singh Rajput Case Latest News | Rhea Chakraborty Arrested In Drug Case, Likely To Approach High Court For Bail

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रियाचा तुरूंगातील सहावा दिवस:रियाचे वकील म्हणाले - हायकोर्टात जामीन अर्ज दाखल करण्यासाठी घाई करु इच्छित नाहीत; ईडी अभिनेत्रीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करू शकते

मुंबई4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
हा फोचो 8 सप्टेंबरचा आहे. यादिवशी नार्कोटिक्स ब्युरोने रियाला अटक केली होती. - Divya Marathi
हा फोचो 8 सप्टेंबरचा आहे. यादिवशी नार्कोटिक्स ब्युरोने रियाला अटक केली होती.
 • रिया चक्रवर्तीची जामीन याचिका यापूर्वी कोर्टाकडून 2 वेळा फेटाळली गेली.
 • ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स ब्युरोने 8 सप्टेंबर रोजी रियाला अटक केली होती.

मुंबईच्या भायखळा कारागृहात असलेल्या रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांचे म्हणणे आहे की, मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी ते घाई करु इच्छित नाही. यापूर्वी लोअर आणि सेशन कोर्टाकडून रिया आणि शोविकची जामीन याचिका दोनदा फेटाळण्यात आली होती. अमली पदार्थांच्या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) दोघांना अटक केली आहे. दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) रियाविरोधात नवीन गुन्हा दाखल करू शकते.

 • आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणात 16 जणांना अटक

रियाला एनसीबीने 8 सप्टेंबर रोजी अटक केली होती. दुसर्‍या दिवशी म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी तिला भायखळा तुरुंगात हलवण्यात आले. रिया आणि शोविक यांच्यासह ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी केवळ एकाला जामीन मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांत करमजीत सिंह आनंद, ड्वेन फर्नांडिस, संकेत पटेल, अंकुश अनरेजा, संदीप गुप्ता आणि आफताब फतेह अन्सारी यांना अटक करण्यात आली. आनंदवर ड्रग्ज सप्लायमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. बॉलिवूडमधील काही लोकांशी त्याचे संबंध असल्याचे सांगितले जात आहे.

 • फर्नांडिसवर सुशांतपर्यंत गांजा पोहोचवल्याचा संशय

एनसीबीच्या एका अधिका-याने सांगितले की, फर्नांडिस गांजा व चरस यांचा सौदा करायचा. तो शोविकची मदत करायचा. असा संशय आहे की, फर्नांडिस सुशांतपर्यंत ड्रग्ज पोचवत असे.

अपडेट्स

 • ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या अनुज केसवानीला 23 सप्टेंबरपर्यंत तुरूंगात पाठविण्यात आले आहे.
 • एनसीबीने सोमवारी शोविकचा मित्र सूर्यदीप मेहरोत्रा ​​याच्या मुंबईच्या घरी छापा टाकला. सूर्यदीपला ड्रग्ज पॅडलिंगच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे.
 • भाजपचे खासदार रविकिशन म्हणाले की, अमली पदार्थांची तस्करी आणि व्यसन वाढत आहे. शेजारी देश आपल्या तरूणांना उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचत आहेत. चीन आणि पाकिस्तानमधून दरवर्षी ड्रग्जची तस्करी केली जाते. चित्रपटसृष्टीतही अमली पदार्थांचे व्यसन वाढत आहे. एनसीबीने अनेक लोकांना अटक केली आहे. मी केंद्र सरकारला आवाहन करतो की, कठोर कारवाई करून दोषींना लवकरच अटक करण्यात यावी.

कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी होत नाहीये

एका न्यूज चॅनेलच्या वृत्तानुसार, रियाने गेल्या आठवड्यात खुलासा केला होता की अभिनेत्री सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंहही ड्रग्जच्या कनेक्शनमध्ये सहभागी होत्या. मात्र एनसीबीने हा दावा फेटाळून लावला असून याप्रकरणी कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीची कोणतीही चौकशी केली जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser