आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रियाचे ड्रग्जसंदर्भातील नवीन चॅट्स आले समोर:रिया आणि सुशांतच्या घरी काम करणा-यांमध्ये झाले होते ड्रग्जविषयी बोलणे, रियाने सॅम्युअल मिरांडाला 'डुबी' आणण्यास सांगितले होते

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंमलबजावणी संचालनालयाने रियाच्या रिट्रीव्ह चॅटच्या आधारे या प्रकरणात ड्रग्ज अँगलचा खुलासा केला होता. त्यानंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या प्रकरणाचा तपास करत आहे.
  • अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वी रियाच्या रिट्रीव्ह चॅटच्या आधारे या प्रकरणात ड्रग्ज अँगलचा खुलासा केला होता.
  • ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रियासह 5 जणांविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अमली पदार्थांचा अँगल समोर आल्यानंतर कलाटणी मिळाली आहे. आता या संदर्भातही नवनवीन खुलासे होत आहेत. ईडी (अंमलबजावणी संचालनालय) च्या तपासणीत ड्रग्स अँगल उघडकीस आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, रियाचे ड्रग्जसंदर्भातील आणखी काही व्हॉट्स अॅप चॅट्स समोर आले आहेत. हे चॅट रियाने बनवलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे आहेत. या ग्रुपचे सॅम्युअल मिरांडा, शोविक चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठानी, आयुष शर्मा, आनंदी आणि दीपेश सावंत हे मेंबर आहेत.

हे सर्व जण स्टफ (ड्रग्ज) आणि सिगारेट रोलविषयी बोलत आहेत. ज्यावरून त्यांचे धागे ड्रग्जशी जोडलेले आहेत, हे सिद्ध होते. या चॅट्समध्ये वॉटरस्टोन रिसॉर्टचा उल्लेख आहे. शिवाय 'ड्रग्ज'चा एक फोटोही शेअर केला आहे. हे सर्व चॅट जुलै 2019 चे आहेत.

समोर आलेल्या नव्या चॅटमध्ये सुशांतच्या घरी होणा-या पार्टीचे नियोजन करण्याबरोबर ड्रग्ज कोणते आणि ते किती घ्यायचे आहे, यासंदर्भात चर्चा आहे. तसेच सुशांतला कोणते ड्रग्ज द्यायचे याचा देखील उल्लेख आहे. मात्र या चॅटमध्ये सुशांत कुठेही बोलताना दिसत नाही. यापूर्वी रियाने काही वृत्त वाहिन्यांशी बोलताना सांगितले की, तिने आयुष्यात कधीही ड्रग्ज घेतलेले नाही आणि ती ब्लड टेस्ट करायला तयार आहे.

पहिला चॅट: यामध्ये सिद्धार्थ पिठानी, आयुष शर्मा, आनंदी आहेत. यांच्यात ड्रग्जबाबत बरीच लांब चर्चा झाली आहे. डुबी हवी आहे, असे रिया चक्रवर्तीने लिहिले आहे. सुश (सुशांत) साठी डुबी पाठवा, असे तिने सांगितले आहे. यावर सिद्धार्थ पिठानी म्हणतो - मिरांडा येथे आहे. डुबी हा एक गांजा सिगारेटचा प्रकार आहे.

यात ड्रग्ज आणि वॉटरस्टोन रिसॉर्टविषयी चर्चा होत आहे.
यात ड्रग्ज आणि वॉटरस्टोन रिसॉर्टविषयी चर्चा होत आहे.

या चॅटमध्ये आणखी एक व्यक्ती लिहितो, "वॉटरस्टोनची ज्या दिवसाची बुकिंग केली होती, ती रद्द झाली आहे." रिया या सदस्याला लिफ्टचा दरवाजा लॉक करण्यास सांगते. या चॅटमध्ये रियाचा भाऊ शोविकही आहे.

दुसरा चॅट : हा चॅट सॅम्युअल मिरांडाचा आहे. त्यात एक व्यक्ती म्हणते, "अशोकला कॉल करा." यावर उत्तर देताना मिरांडा लिहिलो "स्टफ"साठी ना? यावर उत्तर देताना एक जण विचारतो, "आपल्याकडे आता नाहीये". त्यावर मिरांडा म्हणतो, "ठीक आहे." समोरून एकजण सिद्धार्थला सांगतो, "फक्त एकच डुबी शिल्लक आहे." पुढे सिद्धार्थ म्हणतो, "अशोक मॅनेज करुन देईल म्हणतोय." यावर एक जण म्हणतो की, मी त्याला आजच आणायला सांगितले आहे. त्यानंतर सिद्धार्थ अशोकला कॉल करायचे म्हणतो.

यात ड्रग्ज संपल्याविषयी चर्चा होत आहे.
यात ड्रग्ज संपल्याविषयी चर्चा होत आहे.

तिसरा चॅट: सॅम्युअल मिरांडा या ग्रुपमध्ये ड्रग्जचा एक फोटो देखील शेअर करतो.

सॅम्युअल मिरांडाने शेअर केलेले छायाचित्र
सॅम्युअल मिरांडाने शेअर केलेले छायाचित्र
  • सुशांतच्या बहिणीने हे चॅट शेअर केले

हे सर्व चॅट सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने ट्विटरवरही शेअर केले आहेत. तिने या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करुन हे काय चालले आहे? असा प्रश्न केला आहे. या चॅटमध्ये रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठानी आणि सॅम्युअल मिरांडासह अन्य काही जणांमध्ये चर्चा सुरु आहे.