आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत मृत्यू प्रकरण:रिया चक्रवर्ती आज जामिनासाठी उच्च न्यायालयात दाखल करु शकते याचिका, सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने घेतला सोशल मीडियापासून ब्रेक

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआयची एक टीम दिल्लीत दाखल झाली असून आज ते एम्सच्या डॉक्टरांना भेटू शकतात
  • मंगळवारी अटक झालेल्या क्रिस्ट कोस्टाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केले जाऊ शकते

ड्रग्ज प्रकरणात अटक झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती त्यांचे वकील सतीश मानशिंदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करू शकतात. दोघे 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत आणि सत्र न्यायालयाने त्यांची जामीन याचिका यापूर्वी दोनदा फेटाळली आहे. सुशांत प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय टीम दिल्ली येथे पोहोचली असून आज ते एम्सच्या डॉक्टरांना भेटू शकतात. दरम्यान, मंगळवारी अटक केलेला क्रिस्ट कोस्टाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाऊ शकते. आज त्याची एनसीबी कोठडी संपत आहे.

  • सुशांतची बहीण श्वेताने सोशल मीडियापासून ब्रेक घेतला

सुशांतच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावाला न्याय मिळावा यासाठी लढा देणारी त्याची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. तिने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. पुढचे 10 दिवस सोशल मीडियापासून लांब राहणार असल्याचे तिने सांगितले आहे.

श्वेताने लिहिले, 'सुशांत आता आमच्यात नाही, त्याला आता परत कधीच स्पर्श होऊ शकणार नाही. त्याचा तो हसरा चेहरासुद्धा बघता येणार नाही. एवढेच नाही तर त्याने केलेले विनोदसुद्धा आता ऐकता येणार नाहीत. हा खूप मोठा फटका आहे, यातून बाहेर येणे सोपे नाही. पुढील 10 दिवस सोशल मीडियापासून दूर राहून या दु:खातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करेन.'

  • ड्रग्ज अँगलमध्ये नाव आल्यानंतर रकुल प्रीत सिंग उच्च न्यायालयात पोहोचली

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, रिया चक्रवर्तीने ड्रग्ज अँगलच्या चौकशीदरम्यान अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिचे नाव घेतले आहे. ड्रग्ज प्रकरणात मीडियामध्ये हे नाव समोर आल्यानंतर रकुल प्रीत सिंहने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रकुलने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, मीडियाला तिचे नाव घेण्यापासून रोखण्यात यावे, असा आदेश माहिती प्रसारण मंत्रालयाला जारी करावा, अशी मागणी तिने आपल्या याचिकेत केली आहे. आज तिच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.