आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगल:रिया आणि एका बिलियर्ड्स खेळाडूत झाले होते ड्रग्जविषयी बोलणे, भाऊ शोविकचे ड्रग्ज पॅडलरशी असलेले संबंध उघडकीस

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूड आणि राजकारणाशी संबंधित ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करत आहे एनसीबी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेच. आत्महत्येपासून सुरु झालेले हे कोडे हत्या आणि आता ड्रग्जकडे वळले आहे. दरम्यान, एनसीबीने अमली पदार्थ प्रकरणी मुंबईतून दोन जणांना अटक केली आहे. यातील एकाला मुंबईच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, दुसर्‍याची ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. तसेच ऋषभ टक्कर नावाच्या एका खेळाडूचेही याप्रकरणी नाव समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रिया आणि ऋषभ यांच्यात ड्रग्जविषयी चर्चा झाली होती. त्या आधारे ईडी टीमने मंगळवारी ऋषभची सुमारे 8 तास चौकशी केली.

मुंबईच्या जुहू येथे राहणारा ऋषभ टक्कर हा एक बिलियर्ड्स आणि स्नूकर या खेळांतील राष्ट्रीय स्तराचा खेळाडू आहे. समोर आलेल्या चॅटमध्ये ऋषभ रियासोबत 'डूबीज' (ड्रग्जचा एक प्रकार) बद्दल बोलताना दिसत आहे. चॅटमध्ये हे दोघे एका व्यक्तीला पैसे देण्याबद्दल आणि कॉन्ट्राबॅन्ड घेण्याबद्दल बोलत आहेत. आता ऋषभचे बॉलिवूड फ्रेंड सर्कलदेखील तपासले जाऊ शकते आणि आता रियाने कधी ऋषभकडून एखादे कॉन्ट्राबॅन्ड खरेदी केले होते की नाही, याचाही शोध घेतला जातोय.

  • बॉलिवूड आणि राजकारणाशी संबंधित ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करत आहे एनसीबी

सुशांत प्रकरणातील ड्रग्ज अँगलवरुन एनसीबी आता बॉलिवूड आणि राजकारणाच्या संबंधाविषयी चौकशी करत आहे. सूत्रांनी सांगितले की, एनसीबीला बॉलिवूड आणि राजकारणाशी संबंधित काही लोकांची नावेही समजली आहेत. एनसीबीचे पथक या संदर्भात पुरावे शोधत आहेत. काही ठोस पुरावे सापडल्यास येत्या काही दिवसांत त्यांच्याकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • एनसीबी प्रमुख राकेश अस्थाना देखील मुंबईत

एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना हेसुद्धा मुंबईत आहेत आणि या प्रकरणाची बारकाईने चौकशी करत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अ‍ॅक्ट (एनडीपीएस) च्या कलम 20, 27 आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या कलमांतर्गत कुणालाही चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही. परंतु सूत्रांनुसार रियाला प्रथम बोलावले जाऊ शकते.

  • रियाच्या भावाचे ड्रग्ज पेडलरशी असलेले संबंध उघड झाले

मीडिया रिपोर्टनुसार, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीचे ड्रग पॅडलर जैद विलात्रा याच्यासोबत संबंध असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी जैदला एनसीबीच्या पथकाने मुंबईच्या वांद्रे भागातून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान तो बासित परिहार आणि सूर्यदीप मल्होत्रा ​​नावाच्या दोन लोकांच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले. ईडीकडे या दोघांच्या आणि शोविकच्या संभाषणाचे चॅट आहेत.

  • शोविकने जैदचा नंबर मिरांडाला दिला होता

17 मार्च 2020 रोजी शोविकने सॅम्युअल मिरांडाला जैदचा मोबाइल नंबर पाठवला आणि 5 ग्रॅम ड्रग्जसाठी 10,000 रुपये देण्यास सांगितले. त्यानंतर सॅम्युअल मिरांडाने जैदशी पहिल्यांदा संपर्क साधला. सॅम्युअलने बासितचा हवाला देऊन जैदला 3 वेळा कॉल केला होता. जैदने चौकशीत सांगितले की, त्याने दहा हजार रुपये घेतले आणि ड्रग्ज घेण्यासाठी आलेल्या दोन व्यक्तींकडे 5 ग्रॅम ड्रग्ज दिले. मोबाईल लोकेशनवरून उघडकीस आले की, जैद आणि सॅम्युअल मिरांडा 17 मार्च 2020 रोजी एकाच ठिकाणी होते.