आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:युरोप ट्रिपदरम्यान हॉटेलमधील एक पेटिंग बघून खूप घाबरला होता सुशांत, अर्ध्यावर सोडली होती ट्रीप - रिया चक्रवर्तीचा दावा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • युरोप टूरवर असताना सुशांतला हॉटेलमध्ये भूत दिसले होते, असा दावा रियाने केला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. याप्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची ईडी चौकशी करत आहे. या चौकशीदरम्यान रियाने एक खुलासा केला आहे. युरोप टूरवर असताना सुशांतला हॉटेलमध्ये भूत दिसले होते आणि त्यानंतरच सुशांत नैराश्यात गेला, असा धक्कादायक दावा रिया चक्रवर्तीने केला आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये सुशांत, रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती युरोपला गेले होते, त्यावेळी ही घटना घडल्याचे रियाने सांगितल.

रिया चक्रवर्तीने काय सांगितले?

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, रियाने ईडीला सांगितले, 'आम्ही इटलीच्या फ्लोरेन्स शहरातील एका 600 वर्षे जुन्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. या हॉटेलमध्ये मी आणि शोविक एका रुममध्ये राहिलो होतो तर सुशांत वेगळ्या रुममध्ये राहिला होता. काही कामानिमित्त मी आणि शोविक हॉटेलमधून बाहेर गेलो होतो. काही तासांनी आम्ही दोघे हॉटेलमध्ये परतलो, तेव्हा सुशांत हॉटेलच्या एका कोपऱ्यात बसून रुद्राक्ष माळेचा जप करत होतो. यावेळी सुशांत खूप घाबरला होता. तो थरथर कापत होता. त्याला घाम फुटला होता. हे पाहून मी आणि शोविकने सुशांतला रुममध्ये नेले. आम्ही सुशांतला तुझी अशी अवस्था का झाली याबाबत विचारणा केली. तेव्हा सुशांतने एक धक्कादायक घटना सांगितली. ज्या हॉटेलमध्ये आम्ही तिघे थांबलो होतो त्या हॉटेल मध्ये गोया नावाच्या एका प्रसिद्ध चित्रकाराचे पेंटिंग होते. ज्यात एक राक्षस एका मुलाला खातानाचे चित्र रेखाटले होते. ती पेंटिंग पाहून सुशांत खूप घाबरला होता आणि त्याला त्या पेंटिंगमधलं भूत दिसत होतं. तो त्याला बोलवत होता, असे सुशांतने आम्हाला सांगितले. तो प्रचंड घाबरला होता. मी आणि शोविकने सुशांतला कसंबसं सांभाळलं. त्यानंतर आम्ही लगेच ते हॉटेल सोडले', अशी माहिती रियाने दिली.

  • रियाने सांगितले - अर्धवट सोडली ट्रिप

रियाने पुढे सांगितल्यानुसार, “इटलीनंतर आम्ही तिघे ॲास्ट्रियाला गेलो. तिथे आम्ही बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठी 4 दिवसांचे बुकिंग केले होते. मात्र आपल्याला भीती वाटत आहे, आपण परत मुंबईला जाऊ, असे वारंवार सुशांत मला सांगत होता. तो खूप घाबरलेला होता. आम्हाला काहीच सुचत नव्हते. सुशांतची तब्येत बिघडू लागली होती. आमची युरोप टूर 2 नोव्हेंबर 2019 रोजी संपणार होती, मात्र ती मध्येच सोडून आम्ही 28 ऑक्टोबरलाच मुंबईला परत आलो”, असे रियाने सांगितले.

  • परतल्यानंतर मानसोपचार तज्ज्ञांकडे गेलो

रियाने सांगितले, “सुशांत घरी गेल्यावरही सतत बेडरुममध्येच असायचा. अधूनमधून सुशांतच्या ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज यायचे. हे काही दिवस असेच सुरु राहिले. म्हणून आम्ही मानसोपचार तज्ज्ञांकडे गेलो. पण सुशांतला बरं वाटतं नसल्याने आम्ही मानसोपचार तज्ञ बदलत राहिलो. मे महिन्याच्या अखेरीस या भूतांच्या घटनेवरुन सुशांत खूपच चिडचिड करु लागला होता. तो सतत माझ्याशी भांडायचा. 8 जूनच्या रात्री याच विषयावरुन आमचे कडाक्याचे भांडण झाले. शेवटी मी सुशांतच्या घरुन जावे, असे सुशांतने मला सांगितले. हे सांगताना देखील सुशांत माझी किती काळजी करतो, माझ्यावर किती प्रेम करायचा हे मला दिसले. माझ्या डिप्रेशनमुळे तुझे आयुष्य खराब होतंय, तुलाही याचा त्रास होतोय, त्यामुळे तू माझ्यापासून दूर रहा असे तो मला बोलला”, असा दावा रियाने केला.

दरम्यान सुशांतच्या घरी काम करणा-या कुकनेदेखील सुशांत युरोप ट्रिपहून परतल्यानंतर शांत राहू लागला होता, असे मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.