आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरण:खोटी माहिती देणारी शेजारीण डिंपल थवानीविरोधात रिया चक्रवर्तीने दाखल केली तक्रार, सीबीआयनेही फटकारत म्हटले -  ज्याचे पुरावे नाहीत, अशी खोटी माहिती देऊ नको

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 13 जूनला रियाला सुशांतसोबत पाहिल्याचा दावा डिंपल थवानीने केला होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला तुरुंगाबाहेर येऊन आता सहा दिवस झाले आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रियाने सर्वप्रथम तिच्या विरोधात खोटी माहिती देणारी तिची शेजारीण डिंपल थवानी विरोधात तक्रार दाखल केली आहे. रियाने सीबीआयला तक्रार पत्र देत, तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 13 जूनला रियाला सुशांतसोबत पाहिल्याचा दावा डिंपल थवानीने केला होता.

आत्महत्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 जूनला सुशांत सिंह राजपूत रिया चक्रवर्तीला तिच्या घरी सोडण्यासाठी आला होता. आपण त्या दोघांना पाहिले होते, असे डिंपल थवानीने सांगितले होते.डिंपलनेच ही खोटी माहिती माध्यमांना दिली असून, तिच्यावर कारवाई करण्यात यावी, असे तक्रार पत्र रिया चक्रवर्तीने सीबीआयला दिले आहे.

काय म्हणाले रियाचे वकील?
रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनी डिंपलवर प्रसिद्धीसाठी खोटे बोलण्याचा आरोप लावला आहे. 2 मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी डिंपल थवानीने खोटे वृत्त पसरवले, असे त्यांनी म्हटले आहे. ‘मी सुशांतची चाहती असून, मागच्या जन्मीपासूनचे आमचे नाते आहे. आम्ही सोलमेट होतो’, असा दावा डिंपल थवानीने केला होता.

डिंपल थवानीला सीबीआयने फटकारले
डिंपल थवानीने सीबीआयकडे जबाब नोंदवताना आपण स्वतः नव्हे तर दुसऱ्या कोणीतरी त्या दोघांना एकत्र पहिले होते, असे सांगितले होते. तर, त्या व्यक्तीने दोघांना नेमके कुठे पाहिले होते, हे देखील आठवत नसल्याचे तिने म्हटले होते. या उडवा उडवीच्या उत्तरांमुळे सीबीआयने तिला चांगलेच फटकारल्याचे कळते आहे. ज्याचे पुरावे नाहीत, अशी खोटी माहिती देऊ नको, असा समज तिला देण्यात आला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser