आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण:सीबीआयकडून रिया चक्रवर्तीची तब्बल दहा तास कसून चौकशी, काँग्रेसचा भाजपवर आरोप

मुंबई/पणजीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत प्रकरणात ‘भाजप अँगल’ची चौकशी करावी - काँग्रेस

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू केल्याच्या आठव्या दिवशी शुक्रवारी सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्तीची १० तास चौकशी केली. सीबीआय समन्सनुसार रिया बँक खाती आणि इतर कागदपत्रांसह सकाळी ११ च्या सुमारास पोहोचली.

सूत्रांनुसार, सीबीआयने रियाला सुशांतशी झालेली तिची पहिली भेट, घटनेआधी सुशांतशी झालेला वाद आणि पैशांच्या देवाणघेवाणीसह इतर अनेक प्रश्न विचारले. सुशांतचा फ्लॅटमेट राहिलेला सिद्धार्थ पिठानी, व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा हेही चौकशीत सहभागी झाले होते. दरम्यान, मनी लाँडरिंगची चौकशी करणाऱ्या ‘ईडी’ने गोव्यातील हाॅटेल व्यावसायिक गौरव आर्यला ३१ आॅगस्टला हजर राहण्यासाठी समन्स बजावले.

गौरवचे नाव रियासोबतच्या व्हाॅट्सअॅप चॅटमध्ये आले होते. दुसरीकडे, सुशांत प्रकरणात ‘भाजप अँगल’ची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे केली. अमली पदार्थाबाबत संदीपसिंहचे नाव समोर येत आहे. तो ‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिकचा निर्माता आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे. भाजप प्रवक्ता केशव उपाध्याय यांनी हे आरोप फेटाळले.