आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण:रिया चक्रवर्तीची सध्या चाैकशी नाही: बिहार पोलिसांची भूमिका

मुंबई/नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपट दिग्दर्शक रुमी जाफरींचीही चौकशी होऊ शकते

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांचे चारसदस्यीय पथक मुंबईत असून सध्या या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी केली जाणार नसल्याचे बिहार पोलिसांनी म्हटले आहे.

वांद्रे ठाण्यात पत्रकारांनी याबाबत विचारले तेव्हा, पोलिस निरीक्षक कैसर आलम यांनी सांगितले की, सध्या या चौकशीची गरज नाही. आम्ही लक्ष ठेवून आहोत. पथकातील दुसऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सीआरपीसीअंतर्गत रिया चक्रवर्तीला नोटीस पाठवून सहकार्य करण्यास सांगण्यात आले आहे. बिहार पोलिसांनी सुशांतची बहीण श्वेता सिंह, सुशांतची जुनी मैत्रीण अंकिता लोखंडे, सुशांतचा स्वयंपाकी, त्यांचे मित्र आणि काउन्सेलरसह इतरांची चौकशी केली आहे. तसेच सुशांतच्या बँक खात्यांचीही तपासणी केली. चित्रपट दिग्दर्शक रुमी जाफरींचीही चौकशी होऊ शकते.

सुशांतसिंहचे वडील के. के. सिंह यांनी पाटण्यात रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांसह इतरांविरुद्ध तक्रार दिली असून यात रियावर सुशांतचे १५ कोटी रुपये हडप करणे, धमकी देणे आणि कुटुंबीयांना भेटू न देण्यासह इतर आरोप करण्यात आले आहेत. सुशांतने १४ जूनला वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली होती.