आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रेलर आऊट:'चेहरे’च्या ट्रेलरमध्ये दिसली रिया, चित्रपटातील व्यक्तिरेखेशी केली नाही छेडछाड

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी अभिनीत ‘चेहरे’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले. यात सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सतत वादात दिसणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती दिसली. यापूर्वी वादात अडकल्यामुळे रियाचे चित्रपटातील पात्र कापण्याची चर्चा होती. मात्र तसे झाले नाही. ट्रेलरच्या शेवटी काही सेकंदांसाठी तिचा चेहरा दाखवण्यात आला. २ मिनिटे २२ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये तिचा एकही संवाद दिसत नाही.

चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे रिया
चित्रपटात रियाच्या पात्रासाठी इम्रान हाश्मीचे पात्र आपल्या पत्नीला धोका देते आणि तिच्या खुनाचे षड‌्यंत्र रचते. यानंतर अमिताभ बच्चनचे पात्र इम्रानच्या पात्राचे सत्य सर्वांसमोर आणते. याविषयी दिग्दर्शक रूमी जाफरी आणि निर्माते आनंद पंडित यांनी दिव्य मराठीशी चर्चा केली. त्यांनी संागितले, रियाच्या व्यक्तिरेखेशी आम्ही कोणतीच छेडछाड केली नाही. तिच्यामुळेच चित्रपटात वळण येते. सर्वच कलाकारांना योग्य जागा मिळाली आहे. चित्रपटात प्रत्येक पात्राची रहस्यमय बॅकस्टोरी आहे. लोकांना यात चांगली सस्पेन्स थ्रिलर कथा मिळेल.

रियाला काढण्याचा प्रश्नच नव्हता
निर्मात्यांनी आतापर्यंत रियाविषयी मौन धरले होते. मात्र गुरुवारी आनंद पंडित म्हणाले, रियाला काढण्याचा प्रश्नच नव्हता. ती चित्रपटात होती, आहे आणि त्याचा एक महत्त्वाचा भाग राहील. - आनंद पंडित, निर्माते

रहस्यमय ट्रेलर
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बिग बी आणि इम्रान हाश्मी दिसतच आहेत. याची सुरुवात बिग बीच्या व्हॉइस ओव्हरमधून होते. त्यात ते म्हणतात, तुमच्यापैकी एखाद्याने जर गुन्हा केला असेल तर सावधपणे येथून जा...कारण हा खेळ तुमच्यासोबतही खेळला जाऊ शकतो. कथा एका कॉटेलमध्ये राहणाऱ्या चार मित्र अमिताभ बच्चन, रघुबीर यादव, धृतिमान चॅटर्जी आणि अन्नू कपूरवर आधारित आहे. ते रोज सायंकाळी एक खेळ खेळतात. इम्रानलाही या खेळात गुन्हेगार म्हणून सहभागी करून घेतले जाते. खेळाच्या दरम्यान इम्रानच्या भूतकाळातील काही रहस्ये समोर येतात आणि येथेच कथेत मजेदार वळण येते.

बातम्या आणखी आहेत...