आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांतच्या बहिणीचा दावा:रिया चक्रवर्तीने सुशांतवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले होते, त्याला भूताखेतांची भीती दाखवून घरही बदलवण्यास भाग पाडले होते; भावासोबत भेटूही देत नव्हती

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांसह आता पाटणा पोलिसदेखील तपास करत आहेत.
  • सुशांतचा खास मित्र महेश शेट्टी आणि कुक यांचाही जबाब नोंदवला गेला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने भूताखेतांची भीती दाखवून घर बदलवण्यास भाग पाडले होते. हा खुलासा सुशांतची बहीण मीतू सिंहने पोलिसांच्या चौकशीत केला आहे. पाटणा पोलिसांनी मीतूसह सुशांतचा कुक आणि जवळचा मित्र महेश शेट्टी यांचीही चौकशी केल्याचे सांगितले जात आहे.

  • 'रियाने सुशांतवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले होते'

मीतू सिंहने पाटणा पोलिसांना सांगितल्यानुसार, रियाने सुशांतला पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणात ठेवले होते. सुशांतला भूतांच्या गोष्टी सांगून तिने त्याच्या मनात भीती निर्माण केली आणि त्याला घर बदलवण्यास भाग पाडले. तिने सुशांतचा स्टाफही बदलून टाकला होता, चौकशीत पुढे आले आहे. रिपोर्ट्सनुसार, सुशांतने 2015 मध्ये मुंबईत 20 कोटींचे पेंट पेंटहाउस खरेदी केले होते. मात्र, तरीही तो भाड्याने राहात होता. ज्या घरात त्याने आत्महत्या केली, ते भाड्याचे घर होते.

  • सुशांतसोबत भेटूही देत नव्हती रिया

मीतू सिंहने पोलिसांना सांगितले, 'मी जेव्हाही सुशांतला भेटायला त्याच्या वांद्र्यातील घरी जायचे, तेव्हा मला इमारती खाली तासन्तास उभे राहावे लागायचे. रिया सुशांतला मला भेटू देत नव्हती. सुशांत घरी नाही, असे कारण सांगितले जायचे. किंवा जोपर्यंत रिया घरी पोहोचत नाही, तोपर्यंत घराबाहेर उभे राहावे लागायचे, असा खुलासा मीतूने केला आहे.

मीतूच्या म्हणण्यानुसार, रियाला सुशांतच्या बहिणींनी त्याच्या घरात राहिलेले कधीच आवडले नाही... ती सुशांतबरोबर वारंवार भांडत असे. पण रियाची आई संध्या चक्रवर्ती कायम त्यांच्यासोबत त्यांच्या घरी राहात असे. यामुळे सुशांत खूप त्रस्त झाला होता. पण रिया आणि तिच्या कुटुंबाचा त्यांच्यावर खूप दबाव होता. रिया कायम त्याला ब्लॅकमेल करुन बदनाम करण्याची धमकी देत होती.

मीतूच्या मते, सुशांतच्या घराचा ताबा रियाच्या घरच्यांनी घेतला होता. सुशांतला या नात्यातून बाहेर पडायचे होते, मात्र तो रियाच्या धमक्यांना घाबरायचा.

  • मित्र महेश शेट्टी आणि कुक यांचीही चौकशी करण्यात आली

पाटणा पोलिसांनी सुमारे दोन तास सुशांतच्या कुकची चौकशी केली. सुशांतने आत्महत्या केली तेव्हा घरी उपस्थित असलेल्या कुकपैकी तो एक आहे. आत्महत्येच्या दिवशी आवाज देऊनही जेव्हा सुशांतने खोलीचा दरवाजा उघडला नाही, तेव्हा याच कुकने बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकास चावी बनवणा-याला बोलवण्यास सांगितले होते. रिपोर्ट्सनुसार सुशांतचा मित्र महेश शेट्टी याचीही चौकशी करण्यात आली आहे. मृत्यूच्या आदल्या रात्री सुशांतने महेश शेट्टीला फोन केला पण त्याच्यासोबत सुशांतचे बोलणे होऊ शकले नव्हते.