आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरणात CBI चौकशीचा 16 वा दिवस:शोविक-रियाला समोरासमोर बसवून ड्रग्ज प्रकरणी विचारणा होणार; 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या रिमांडमध्ये राहणार शोविक चक्रवर्ती, मिरांडालाही 4 दिवसांची कोठडी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती, शोविक यांच्यावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
 • ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, कैजान इब्राहीम, जैद आणि बासित परिहार यांना अटक झाली आहे.
 • सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ती हिने एनसीबीचे छापे ही चांगली सुरुवात असल्याचे म्हटले आहे. तिने ट्वीट केले-‘थँक यू गॉड, ग्रेट स्टार्ट एनसीबी.’

अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी ड्रग्ज कनेक्शनचा तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) शोविक चक्रवर्ती आणि रिया चक्रवर्ती यांना समोरासमोर बसवून चौकशी करणार आहे. दरम्यान ड्रग्ज कनेक्शनच्या प्रकरणात शोविक चक्रवर्ती 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या रिमांडमध्ये राहिल. मिरांडालाही 4 दिवसांच्या रिमांडवर पाठवण्यात आले आहे. तर कैजान 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत राहिल. एनसीबीने शुक्रवारी रात्री उशीरा रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सुशांत सिंह राजपूतचा हाउस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला अटक केली होती.

दोघांना आज कोर्टात हजर करण्यात आले. येथे त्यांना एनसीबीच्या कस्टडीमध्ये पाठवण्यात आले. एनसीबीने 7 दिवसांची रिमांड मागवली होती. मात्र न्यायालयाने त्यांना फक्त 4 दिवसांच्या रिमांडवर पाठवले आहे. यापूर्वी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाप्रकरणी शनिवारी सीबीआय आणि एम्सची टीम सुशांतच्या वांद्राच्या घरी पोहोचली होती. येथे दीड तास व्हिडिओग्राफी आणि फोटोज घेण्यात आले. येथे सुशांतची बहीण मितू सिंहही उपस्थित होती.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) शुक्रवारी रात्री अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा या दोघांना अटक केली. त्याआधी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांची 10 तास चौकशी केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी दोघांच्या घरांवर छापे टाकले. यात कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाइल फोन आदी ताब्यात घेत दोघांना चौकशीसाठी सोबत नेले. दोघांची रात्री 9.30 पर्यंत चौकशी झाली आणि नंतर लगेच त्यांना अटक केली.

 • आज कोर्टासमोर करणार हजर

मिरांडा आणि शोविक चक्रवर्ती यांना आज कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. तेथून त्यांना एनसीबीच्या कस्टडीत पाठवले जाऊ शकते. तत्पूर्वी लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये शोविक आणि मिरांडा यांची मेडिकल चाचणी करण्यात येणार आहे. सोबतच ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेले कैजान इब्राहिम आणि जैद यांनाही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. या चौघांचीही कोरोना टेस्ट केली गेली. सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दरम्यान सीबीआयची टीम सुशांतच्या वांद्रास्थित घरी पोहोचली आहे. येथे सुशांतची बहीण मितू सिंह ही देखील हजर आहे.

काळ्या रंगाच्या हुडीत रियाचा भाऊ शोविक. शनिवारी त्याला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी मीडियाच्या कॅमे-यांपासून त्याने स्वतःचा बचाव केला.
काळ्या रंगाच्या हुडीत रियाचा भाऊ शोविक. शनिवारी त्याला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी मीडियाच्या कॅमे-यांपासून त्याने स्वतःचा बचाव केला.
 • रिया चक्रवर्तीला होऊ शकते अटक

सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि त्याच्या घरी काम करणारा दीपेश सावंत यांनादेखील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) कडून अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दीपेशची संपूर्ण रात्रभर चौकशी झाली.

 • वकील विकास सिंह म्हणाले - मुंबई पोलिस काहीतरी लपवत असल्याचे सिद्ध झाले

सुशांत सिंह राजपूतचे वडील के.के. सिंह यांचे वकील विकास सिंह म्हणाले की, एससीबीच्या चौकशीत काही मोठ्या गोष्टी मुंबई पोलिस लपवत असल्याचे समोर आले आहे. हे स्पष्ट आहे की या प्रकरणात बरेच अँगल आहेत. .

 • रियाच्या अटकेचा विचार का केला जात आहे?

आज एनसीबी रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी समन्स पाठवू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे रियाच्या सांगण्यावरुन अनेक वेळा ड्रग्ज खरेदी केल्याचे शोविक नाकारू शकला नाही. यावरुन आता रियाची अटक देखील जवळजवळ निश्चित मानली जात आहे.

शुक्रवारी सकाळी 6.40 वाजता रिया आणि मिरांडाच्या घरावर छापा घालून सुरू झालेली एनसीबीची धडक कारवाई अजूनही सुरू आहे. त्याशिवाय सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीचा आज 16 वा दिवस आहे. सुशांतच्या संपर्कात असलेल्या आणखी काही लोकांना आज डीआरडीओ कार्यालयात बोलावण्यात येईल.

 • शोविकचा ड्रग्ज पॅडलरशी संपर्क असल्याचा पुरावा

ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या कैझान, बासित परिहार आणि जैद यांच्याशी शोविकचा थेट संपर्क होता. शोविक आणि बासितची भेट फुटबॉल क्लबमध्ये झाली. बासितने शोविकची ड्रग्ज पुरविणा-या सोहेलसोबत भेट घालून दिली होती. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या संदर्भात अटक झालेल्या बासितने मुंबईच्या कोर्टाला सांगितले की, तो शोविकच्या सांगण्यावरून ड्रग्ज खरेदी करीत असे.

 • मिरांडा आणि जैद यांच्यातील संपर्कही सिद्ध झाला

मिरांडाने चौकशी दरम्यान सांगितले की, तो सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करीत असे. मिरांडा जैदमार्फत बड्स विकत घेत असत. मिरांडाला जैदचा नंबर शोविकने दिला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर जुलै महिन्यातदेखील मिरांडाला ड्रग्ज पुरविल्याचेही जैदने चौकशीत कबूल केले. शोविकने यासाठी रोख पैसे दिले असल्याचेही जैदने म्हटले आहे.

 • मिरांडाची पत्नी एनसीबी कार्यालयात पोहोचली

दरम्यान, अटकेची बातमी समजताच मिरांडाचा वकील आणि पत्नी एनसीबी कार्यालयात पोहोचले. मिरांडाच्या वकिलांनी माध्यमांना सांगितले की, त्यांच्याजवळ सांगण्यासारखे काही नाही. मिरांडावर कोणते आरोप आहेत आणि त्याला कुठल्या कोर्टात हजर केले जाणार आहे, हे जाणून घेण्यासाठी ते येथे आले आहेत.

 • एनडीपीएसच्या या कलमांतर्गत अटक

दरम्यान, एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा ​​म्हणाले की, शोविक आणि मिरांडावर भारतीय आणि विदेशी चलनातून ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोप आहे. तांत्रिक पुराव्यांनंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सापडलेल्या पुराव्यास शोविक आणि मिरांडा नाकारू शकले नाहीत. दोघांना ऑफेंसेज ऑफ ड्रग्ज कंजम्पशन, अरेंजिंग प्रोक्योरिंग ड्रग यासारख्या एनडीपीएसच्या कलम 20 बी, 28 आणि 29 अंतर्गत अटक केली आहे. या नंतर 27 ए सेक्शन देखील यात समाविष्ट आहे.

 • सुशांतसाठी गांजा खरेदीची मिरांडाने दिली होती कबुली

दरम्यान, एनसीबीने कोर्टाला सांगितले की, आपण सुशांतसाठी अमली पदार्थ खरेदी करत होतो, असे मिरांडाने चौकशीत कबूल केले आहे. आपण शोविक चक्रवर्तीच्या सूचनेवरून अमली पदार्थ खरेदी करत होतो, असे अटकेतील एजंट अब्देल बासित परिहारने सांगितले.

 • सुशांतच्या बहिणीने मानले देवाचे आभार

सुशांतची बहिण श्वेता सिंहने सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच श्वेता सिंहने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने ‘एनसीबी खूप चांगले काम करत आहे… देवाचे आभार’ असे म्हटले असून त्यासोबत हात जोडल्याचे इमोजी वापरले आहेत. तसेच हॅशटॅग वापरत ग्रेट स्टार्ट एनसीसीबी असे म्हटले आहे.