आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पहिल्यांदाच मीडियासमोर सोडले मौन:रिया चक्रवर्ती म्हणते, 'सुशांत 2013 पासूनच डिप्रेशनमध्ये होता, आता मलाही आत्महत्या करावीशी वाटतेय'

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रियावर सुशांतच्या घरातील 8 हार्ड डिस्कमधील डेटा डिलीट केल्याचा आरोप आहे.
  • माझ्याकडे लपवण्यासारखे काही नाही, असे रिया चक्रवर्ती म्हणते.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच माध्यमांसमोर स्वत:ची बाजू मांडली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रिया म्हणाली, 2013 पासूनच सुशांत तणावात होता. तेव्हा तो हरेश शेट्टी या मानसोपचार तज्ज्ञांनाही भेटत होता.

रिया म्हणाली, सुशांतसोबत युरोपला जात असताना विमानात बसायला भीती वाटते असे त्याने सांगितले होते. यासाठी तो मोडाफिनिल हे औषधही घेत होता. पॅरिसला गेल्यानंतर तीन दिवसांपर्यंत तो खोलीच्या बाहेर पडला नव्हता. तेव्हा खोलीमध्ये काहीतरी असल्याचे सुशांतने म्हटले होते. मात्र हे वाईट स्वप्नही असू शकते, असे मी त्याला म्हणाले होते. तेव्हापासून त्याच्यामध्ये बदल झाला.

  • सततच्या आरोपांना कंटाळली आहे, अता मलाही आत्महत्या करावीशी वाटतेय - रिया

मुलाखतीत रियाने सततच्या आरोपांना कंटाळून ‘मला आत्महत्या करावीशी वाटते’, असे म्हटले आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणात अमली पदार्थांचा अँगल समोर आल्यानंतर आता नार्कोटिक्स विभागदेखील तिची चौकशी करणार आहे. रिया सुशांत ड्रग्ज देत होती, असा आरोप तिच्यावर आहे. यावर तिला मुलाखतीत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर बोलत असताना एक बंदूक आणा आणि मला आणि माझ्या कुटुंबाला एका रांगेत उभे करुन मारुन टाका किंवा आम्हीच आत्महत्या करतो, असे ती म्हणाली आहे.

'मला खरंच आत्महत्या करावीशी वाटते. फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबीयांनीदेखील आत्महत्या करायला हवी असेच मला वाटायला लागले आहे. असे रोज मरत-मरत जगण्यापेक्षा, ही रोजची बदनामी सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. पण मग मी आत्महत्या केल्यानंतर त्याला जबाबदार कोण?, असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. ती पुढे म्हणते, आज मी ड्रग डिलर आहे, कालपर्यंत मी एक खुनी होते आणि आता आणखी काही असेल. हे खरंच निरर्थक आणि अर्थहीन आहे, असे ती म्हणाली.

  • हार्डडिस्कबाबत त्याच्या बहिणीलाच विचारा...

रिया म्हणाली, मी सुशांतच्या घरी असताना हार्डडिस्कमधून कोणताही डेटा डिलीट केलेला नाही. मी गेल्यानंतर सुशांतची बहीण तिकडे गेली होती. तिलाच याबाबत विचारावे. मी सुशांतवर कधीही नियंत्रण मिळ‌वण्याचा प्रयत्न केला नाही.

  • लपवण्यासारखे काही नाही

सुशांतवर मनापासून प्रेम करणे ही एकच चूक असल्याचे रियाने या मुलाखतीत म्हटले आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपास कुणीही करो, मला काहीच फरक नाही, कारण माझ्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असेही ती म्हणाली.

  • ड्रग्ज पुरवठा : एनसीबी करणार 20 जणांची चौकशी

सुशांत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ईडी व सीबीआयसोबतच नार्काेटिक्स नियंत्रण ब्युरोचे (एनसीबी) पथकही सामील झाले आहे. एनसीबी अधिकारी मुंबईत दाखल झाले. एनसीबी पथक ड्रग अँगलचे कोडे सोडवण्यासाठी 20 जणांची चौकशी करू शकते. सूत्रांनुसार, संस्थेने ड्रग्ज पुरवठा प्रकरणी 20 संशयितांची यादी केली आहे. यात गौरव आर्य, स्वेद लोहिया, जया साहा, एजाज खान, फारुख बटाटा, बकुल चंदानीसह इतरांचा समावेश आहे. सीबीआयने गुरुवारी रियाचा भाऊ शोविकची चौकशी केली. संस्था सुशांतसोबत राहणारे सिद्धार्थ पिठानी, कामगार दीपेश सावंत, स्वयंपाकी नीरज सिंह यांचे जबाब शोविकच्या जबाबाशी पडताळून पाहत आहे.

0