आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रियाचा तुरुंगातील पहिला दिवस:इंद्राणी मुखर्जीच्या शेजारच्या बॅरेकमध्ये आहे रिया चक्रवर्ती; पहिल्या दिवशी जेवणात मिळाला वरण-भात, जमिनीवर काढावी लागली रात्र

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रियाने तुरूंगातील कर्मचार्‍यांकडे वाचनासाठी काही पुस्तके मागितली.

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती आता भायखळा तुरुंगात आहे. बुधवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या कोठडीतून रियाची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली आहे. येथे तिला महिलांच्या जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. रियाने तुरुंगाच्या बॅरेक क्रमांक 1 च्या लॉकअपमध्ये पहिली रात्र घालवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शीना बोरा हत्या प्रकरणात अटक झालेल्या इंद्राणी मुखर्जीच्या बॅरेकच्या शेजारीच ही बॅरेक आहे.

असा राहिला रियाचा तुरुंगातील पहिला दिवस

  • सूत्रांच्या माहितीनुसार रियाला बुधवारी दिवसभर जनरल बॅरेकमध्ये ठेवण्यात आले, नंतर उशीरा रात्री तिला बॅरेक नंबर एकमध्ये हलवण्यात आले.
  • पहिला दिवस असल्याने रिया चक्रवर्ती जेलच्या कर्मचार्‍यांशी फक्त बोलली आणि रात्रभर तिच्या बॅरेकमध्ये थांबली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिया रात्री बर्‍याच वेळा उठली आणि तिला नीट झोप आली नाही.
  • बुधवारी दुपारी तुरूंगातील डॉक्टरांनी रियाची तपासणी केली आणि तिचे ब्लड प्रेशर, शूगर लेव्हल आणि पल्स चेक केले. चेकअपमध्ये सर्वकाही सामान्य आल्यानंतर रियाला विश्रांतीसाठी पाठवले गेले.
  • तिला बॅरेकमध्ये एक ब्लँकेट, उशी आणि सफेद चादरसह डेंटल किट आणि दररोजच्या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. रियाने तुरूंगातील कर्मचार्‍यांकडे वाचनासाठी काही पुस्तके मागितली.
  • कारागृहात बेड नाहीत, त्यामुळे रियाला जमिनीवर झोपावे लागले संध्याकाळी पाच वाजता जेवणात तिला भात, वरण आणि दोन पोळ्यांसह भोपळ्याची भाजी देण्यात आली.
  • याच तुरुंगात शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीदेखील आहेत. विशेष म्हणजे या तुरुंगात इंद्राणी मुखर्जी यांची लोकप्रियता असल्याचे सांगण्यात येत आहे. 2017 मध्ये मंजुला या महिला आरोपीचा तुरुंगात मृत्यू झाल्यानंतर इंद्राणी मुखर्जी यांनी तुरुंगात निदर्शने केली होती. तेव्हापासून तुरुंगात त्यांची लोकप्रियता निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. या तुरुंगात इंद्राणीसह 250 आरोपी असल्याचे समजते. तसेच तुरुंगात येणाऱ्या प्रत्येक नव्या आरोपीची इंद्राणी मुखर्जी भेट घेतात, असेही म्हटले जाते.
बातम्या आणखी आहेत...