आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:पाटण्यातून मुंबईत खटला हस्तांतरीत करण्याच्या रियाच्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला, 13 ऑगस्टपर्यंत सर्व पक्षांकडून लेखी उत्तर मागितले

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रियाने पाटण्यात दाखल असलेला खटला मुंबईत ट्रान्सफर करण्यासाठी याचिका दाखल केली होती. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर दाखल केला होता.
  • ईडीच्या टीमने सोमवारी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी यांची साडे दहा तास चौकशी केली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाने सर्व पक्षांकडून 13 ऑगस्टपर्यंत लेखी उत्तर मागितले आहे. रियाने सुशांतचे वडील केके सिंह यांच्या वतीने पाटणा येथे दाखल केलेला खटला मुंबईत हस्तांतरित करण्यासाठी याचिका दाखल केली होती.

सुशांतच्या वडिलांच्या एफआयआरचा पाटण्यातील कोणत्याही गुन्ह्याशी संबंध नाही. प्रकरण एकतर्फी आहे. यात राज्य मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करीत आहे, असा युक्तिवाद रियाच्या वकिलांनी कोर्टात केला.

तत्पूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने सोमवारी रिया, तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित आणि सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी यांची 10 तास चौकशी केली. सोमवारी पहिल्यांदाच सुशांतच्या रूममेट सिद्धार्थ पिठानीचीही सुमारे सहा तास चौकशी केली गेली.

बिहार निवडणुकीमुळे सुशांतचे प्रकरण तापवले जातेय : रिया चक्रवर्ती

सुशांत सिंहच्या वडिलांच्या तक्रारीवरून बिहारमध्ये दाखल गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे अभिनेत्री रिया चक्रवर्तीने 14 पानांच्या शपथपत्रात म्हटले आहे.

सीबीआयकडे प्रकरण सोपवणे हे बेकायदेशीर

रियानुसार, बिहारमध्ये निवडणूक होणार असल्याने तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारच्या लोकांचे भावनिक संबंध सुशांतसिंह राजपूतशी आहेत. लोकांच्या भावनांचा वापर मतांसाठी करण्यासाठी राजकीय हेतूने बिहार सरकारने या प्रकरणात उडी घेतली आहे. आधी गुन्हा दाखल केला व नंतर सीबीआय चौकशीची शिफारस केली. ती करण्याचा अधिकार बिहार सरकारला नव्हता.

अभिनेता आशुतोष भाकरे आणि समीर शर्मा यांनीही आत्महत्या केली, पण या दोन्ही प्रकरणांबाबत माध्यमांमध्ये काहीच चर्चा रंगली नाही, असा तर्कही रियाने केला.

बातम्या आणखी आहेत...