आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोविंदाला त्याचा हक्क मिळाला असता तर तो आजचा देशातील सर्वात मोठा सुपरस्टार झाला असता, असे दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाला आहे. गोविंदा आणि डेव्हिड धवनच्या जोडीने 90 च्या दशकात शोला और शबनम, राजा बाबू, आँखे, जोडी नंबर 1, कुली नंबर 1, हसीना मान जायेगी सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले पण तरीही गोविंदा ज्यासाठी पात्र होता ते त्याला मिळाले नाही, असे रोहित शेट्टीने म्हटले आहे.
रोहितच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियाच्या काळात एखाद्या अभिनेत्याचा एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की सगळीकडे त्याचा गाजावाजा होता. गोविंदाने तर 10 वर्षे बॅक टू बॅक हिट चित्रपट दिले होते, असे रोहित म्हणाला.
गोविंदाच्या चित्रपटांबद्दल केले भाष्य
रोहित शेट्टीने अलीकडेच त्याच्या सर्कस चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याला 1993 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाबद्दल विचारणा झाली. त्यावर रोहितने क्षणाचाही विलंब न लावता गोविंदा आणि चंकी पांडे स्टारर आँखे या चित्रपटाचे नाव घेतले. या विषयावर पुढे बोलताना रोहित शेट्टीने गोविंदाच्या एकापाठोपाठ एक आलेल्या हिट चित्रपटांवर भाष्य केले.
90च्या दशकात गोविंदा बॉक्स ऑफिसचा बादशहा होता
गोविंदाने आपल्या करिअरची सुरुवात 1986 मध्ये आलेल्या 'इलजाम' चित्रपटातून केली होती. त्याने 80 च्या दशकापर्यंत फॅमिली ड्रामा चित्रपट केले होते, परंतु 1990 च्या दशकात त्याने एक विनोदी अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
गोविंदाने आपल्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर कॉमेडी चित्रपट केले आहेत, ज्यात राजा बाबू, कुली नंबर 1, हीरो नंबर 1, दीवाना मस्ताना, दुल्हे राजा, बडे मियाँ छोटे मियाँ, अनाडी नंबर 1 आणि जोडी नंबर 1 सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
यानंतर 2000 च्या दशकात भागम भाग, पार्टनर, लाइफ पार्टनर आणि सँडविच सारख्या चित्रपटात काम केले. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली.
'सर्कस'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे रोहित
रोहित शेट्टीबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या त्याच्या आगामी 'सर्कस' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात रणवीर सिंग, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा, टिकू तलसानिया, जॉनी लिव्हर आणि संजय मिश्रा यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.
हा चित्रपट 23 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटातील एक गाणे रिलीज झाले होते, ज्यामध्ये दीपिका पदुकोणचा डान्स नंबर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.