आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित शेट्टीचा 49 वा वाढदिवस:8 वर्षांत सलग 7 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले, एकेकाळी घराचे भाडे देण्यासाठीही जवळ पैसे नव्हते

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 49 वर्षे पूर्ण केली आहेत. बॉलिवूड चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फारसा चांगला प्रतिसाद मिळत नसताना रोहित शेट्टीचे चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. 'सूर्यवंशी', 'सिम्बा', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'सिंघम' आणि 'गोलमाल अगेन' सारखे चित्रपट बनवणाऱ्या रोहितकडे सक्सेस मंत्रा आहे.

वयाच्या 11 व्या वर्षी वडिलांना गमावले, घरभाडे देण्यासाठीही पैसे नव्हते
रोहित हा प्रसिद्ध फाईट मास्टर एमबी शेट्टी यांचा मुलगा आहे. लोक त्यांना फायटर शेट्टी या नावानेही ओळखतात. रोहितने बालपणीच चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आपल्या वडिलांसारखे व्हायचे होते. तो 11 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर घर विकायची वेळ आली. आर्थिक परिस्थिती एवढी बेताची होती की, त्यांना घराचे घराचे भाडे देणेही अवघड झाले होते, त्यामुळे त्यांना आजीच्या घरी राहावे लागले. रोहितच्या आईने अंधेरी फिल्म हबमधील मत्राज स्टुडिओमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली.

रोहितने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझे वडील त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेते-दिग्दर्शक होते. माझ्या वडिलांचे जाणे माझ्यासाठी मोठा धक्का होता. मला कधीच कशाची कमतरता नव्हती. मी आदर, संपत्ती आणि प्रसिद्धी पाहिली होती, परंतु अचानक सर्वकाही संपले होते.

पहिली कमाई होती 35 रुपये, पायीच चित्रपटाच्या सेटवर पोहोचायचा

एका मुलाखतीत रोहित शेट्टी म्हणाला होता, लोकांना वाटते की मी फिल्म इंडस्ट्रीतील असल्यामुळे मला चित्रपटांमध्ये कोणतेही कष्ट न करता काम मिळाले. पण तसे नाही. मी अनेक कठीण निर्णय घेतले आहेत. कधीकधी खाणे आणि काम करणे यापैकी एक निवडणे हा सर्वात कठीण निर्णय होता. आधी आम्ही सांताक्रूझला राहत होतो, नंतर दहिसरला शिफ्ट झालो. तिथे मी माझ्या आजीसोबत राहत होतो. रोज एवढं लांब चालल्यामुळे मला रस्ते तोंडपाठ झाले होते. आता जेव्हा जेव्हा मी त्या बाजूला जातो तेव्हा मी स्वतः ड्रायव्हरला मार्गदर्शन करतो.

एका मुलाखतीत सुरुवातीच्या दिवसांत आलेल्या अडचणींबद्दल बोलताना रोहितने सांगितले होते की, त्याचा पहिला पगार फक्त 35 रुपये होता. रोहित उन्हाळ्यातही दोन तास चालत चित्रपटाच्या सेटवर पोहोचायचा.

कोणत्याही मुलाला शिक्षण सोडावे लागू नये

1991 मध्ये आर्थिक अडचणींमुळे रोहितला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. वयाच्या 15 व्या वर्षी रोहितने कुकू कोहलीसोबत 'फूल और कांटे' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. एका मुलाखतीत रोहित म्हणाला- कोणत्याही मुलाने अभ्यास सोडून नोकरी करावी असे मला वाटत नाही. शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे आहे, परंतु कधीकधी आपली परिस्थिती कठीण असते. जेव्हा जेव्हा मी '3 इडियट्स' किंवा 'रंग दे बसंती' सारखे चित्रपट पाहतो तेव्हा मला असे वाटते की, मी फारसा शिकलेलो नसल्याने असे चित्रपट कधीच करू शकणार नाही.

रोहितचा चित्रपट साईन करण्यास कोणतेही प्रोडक्शन हाऊस तयार नव्हते

'फूल और कांटे' या चित्रपटातून अजय देवगण पदार्पण करत होता. या चित्रपटाच्या सेटवर रोहित आणि अजय देवगणची मैत्री झाली. अजय हा अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचा मुलगा आहे. या चित्रपटाच्या सेटवर रोहित प्रथमच वीरू देवगण यांना भेटला, ते चित्रपटाच्या स्टंट्सची कोरिओग्राफी करत असत.

अजय देवगणने 'दिल क्या करे' आणि 'राजू चाचा' या चित्रपटांद्वारे त्याच्या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली. यासोबत रोहित शेट्टी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचा. 'राजू चाचा' हा बिग बजेट चित्रपट होता, पण हा चित्रपट तिकीटबारीवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. यामुळे अजय देवगणला खूप त्रास सहन करावा लागला. अजय आणि रोहितला दोन वर्षे प्रोडक्शन हाऊस बंद करावे लागले. सर्व कर्ज परत केल्यानंतर त्यांनी 'जमीन'मध्ये एकत्र दिग्दर्शन केले.

'गोलमाल' चित्रपटाने बदलले नशीब
2003 ते 2006 हा काळ दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीसाठी सर्वात वाईट काळ होता. रोहितने 'गोलमाल'च्या स्क्रिप्टवर काम करायला सुरुवात केली. काम पूर्ण झाल्यानंतरही एकही अभिनेता चित्रपटात काम करण्यास तयार नव्हता. कोणत्याही प्रोडक्शन हाऊसने रोहितसोबत करारही केला नाही. 2006 मध्ये 'गोलमाल' रिलीज झाल्यानंतर रोहितचे नशीब पालटले. चित्रपट निर्माते नीरज व्होरा यांनी रोहितला 'अफलातून' नावाचे नाटक सांगितले. रोहितला या नाटकाचे चित्रपटात रूपांतर करायचे होते. त्यादरम्यान धिलिन मेहता यांच्या श्री अष्टविनायक सिने व्हिजन नावाच्या निर्मिती संस्थेने रोहित शेट्टी आणि इम्तियाज अली यांना करारबद्ध केले. 'गोलमाल' चित्रपटाच्या रिलीजने रोहितच्या नावावर कॉमेडी फ्रँचायझी जोडली.

80 च्या दशकानंतर पहिल्यांदाच एखाद्याने सलग सात हिट्स केले
दिग्दर्शक रोहित शेट्टी हा मनमोहन देसाईंनंतरचा पहिला दिग्दर्शक आहे ज्याचे सलग सात चित्रपट हिट झाले. यामुळे रोहितला बॉक्स ऑफिसचा प्रेसिडेंट देखील म्हटले जाते. दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी खालिद मुहम्मद डॉक्युमेंट्रीमध्ये रोहित शेट्टीची स्वतःच फिल्म स्कूल असल्याचे म्हटले होते. त्याच्यासारखा चित्रपट कोणी बनवू शकत नाही.

माझे प्रेक्षक हा माझा यशाचा मंत्र आहे

आपला यशाचा मंत्र सांगताना रोहित म्हणाला - आम्ही हॉलिवूड नाही. मध्यमवर्गीय कुटुंबांना चित्रपट पाहताना हसावंसं वाटतं हे मी समजतो. माझे समीक्षक मोठ्या कॉफीहाऊसमध्ये जातात, बातम्या पाहतात आणि जगाशी संवाद साधतात. पण हा माझा प्रेक्षक नाही. तुम्ही मुंबईबाहेर 100 किमी जा, जग बदलेल. ते माझे प्रेक्षक आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबाला चित्रपटांमध्ये काय पहायचे आहे, हे मला माझ्या संघर्षामुळेच समजले.

बातम्या आणखी आहेत...