आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्कस:रणवीर सिंहच्या सर्कससाठी रोहित शेट्टीने हायर केले होते 150 जिम्नॅस्ट आणि अ‍ॅक्रोबॅट्स, चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनच्या मॉनिटरिंगचे काम सुरु

अमित कर्ण17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शूटिंगच्या आधी सेटवर दोन तास सराव करायचा रणवीर

रणवीर सिंहचा आगामी सिनेमा 'सर्कस' आहे, दिग्दर्शक रोहित शेट्टी हा सिनेमा मोठ्या पातळीवर बनवणार आहे. यासाठी त्याने 150 प्रशिक्षित जिम्नॅस्ट आणि अ‍ॅक्रोबॅट्सला घेतले आहेत. रोहितने या 150 जिम्नॅस्ट आणि अ‍ॅक्रोबॅट्ससोबत 15 दिवस न थांबता शूटिंग केले. त्यामुळे हा चित्रपट 90 दिवसांत पूर्ण झाला आहे. अधिकृत सूत्रानुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी एका मोठ्या सर्कस कंपनीचे जग उभारले आहे. यावेळी रोहितने यात विनोद आणि गंभीर दृश्याचे मिश्रण केले आहे. हे कलाकार ज्या परिस्थितीत अडकतात त्यातून विनोद निर्माण होतो.

  • रात्रीच्या वेळी शूटिंग केल्याने झाला फायदा

'सर्कस'चे बरेच शूटिंग नाईट शिफ्टमध्ये झाले आहे. अशा वेळी ब-याच कलाकारांना लोकेशनवर जाण्याची सोय होती. यावेळी कोणताही त्रास झाला नाही. कोविड प्रोटोकॉलचे नियम पाळून शूटिंग करण्यात आले. याशिवाय सराव करण्यासाठी रणवीरला अतिरिक्त वेळही मिळायचा. तो सेटवर उर्वरित कलाकारांसोबत दररोज सराव करत होता.

  • 'सर्कस'चा काळ परत आणण्याचा प्रयत्न

सेटवर उपस्थित सूत्रानुसार, रणवीर सिंहच्या पात्राच्या माध्यमातून रोहित जवळजवळ विलूप्त होत चाललेली सर्कसची संस्कृती पुन्हा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. रणवीर यात सर्कसच्या संचालकाच्या रुपात दिसणार आहे. 90 च्या दशकात सर्कस कंपनीत ज्या प्रकारे साहसी, धाडसी कसरती होत्या, जादूचा खेळ दाखवला जात होता, ते सर्व यात दाखवले जाणार आहे. शूटिंगचा एक मोठा भाग सर्कसच्या विविध पैलूवर आधारित आहे. तज्ज्ञ लोकांसोबत शूटिंग करण्यात आले आहे.

  • दक्षिण आफ्रिकेतून मॉनिटरिंग करतोय रोहित

हा चित्रपट सध्या पोस्ट प्रॉडक्शन स्टेजमध्ये आहे. दुसरीकडे रोहित सध्या दक्षिण आफ्रिकेत 'खतरों के खिलाडी' या रिअ‍ॅलिटी शोच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात रणवीरच्या व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे आणि वरुण शर्मादेखील आहेत.

बातम्या आणखी आहेत...