आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीचा हात:रोजंदारी मजुरांनंतर आता रोहित शेट्टी यांनी केली फोटोग्राफर्सची मदत, थेट बँक खात्यात पैसे केले ट्रान्सफर 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोहित शेट्टी यांनी या फोटोग्राफर्सच्या खात्यात थेट निधी पाठविला आहे.

फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित रोजंदारी मजुरांना मदत केल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी फोटोग्राफर्ससाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनाव्हायरस या साथीच्या आजारामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीतील फोटोग्राफर, विशेषत: पापाराझी बेरोजगार झाले आहेत आणि त्यांच्यासमोर रोजीरोटीचे संकट आणखीनच तीव्र झाले आहे. या कठीण काळात रोहित शेट्टी पापाराझीचा आधार बनले आहेत. त्यांनी या फोटोग्राफर्सच्या खात्यात थेट निधी पाठविला आहे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबियांची मदत होऊ शकेल.

  • फोटोग्राफर्सनी मानले आभार

थेट पापाराझीच्या खात्यात पैसे मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी फोटोग्राफर्स रोहित शेट्टी यांचे आभार मानत आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध छायाचित्रकार विरल भयानी यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. ते लिहितात - रोहित शेट्टी यांचे मनापासून आभार. त्यांनी पापाराझी फोटोग्राफर्सच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहे. आम्ही सर्वजण रोहित शेट्टी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला 'सूर्यवंशी' (शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट) च्या अफाट यशासाठी शुभेच्छा देतो." विरल यांची फोटोग्राफर्सची एक खूप मोठी टीम असून हे लोक डे-टू-डे इव्हेंट कव्हर करण्यासाठी फिल्डवर असतात.

  • दैनंदिन मजुरांच्या मदतीसाठी 51 लाखांची देणगी दिली

मार्च महिन्याच्या सुरुवातीला रोहित यांनी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित रोजंदारीवर काम करणा-या मजुरांना मदत केली. त्यांनी वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज युनियन (एफडब्ल्यूआयसीई)ला 51 लाख रुपयांची देणगी दिली. ही संस्था स्पॉटबॉय, ज्युनियर आर्टिस्ट्स आणि लाइटमन यांच्यासह सर्व प्रकारच्या लोकांसाठी काम करीत आहे ज्यांच्यावर कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे रोजीरोटीचे संकट उभे राहिले आहे.  यासाठी महासंघाचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करुन रोहित शेट्टी यांचे आभार मानले आहेत.

बातम्या आणखी आहेत...