आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Rohit Shetty Trending On Twitter After Vikas Dubey Encounter, Users Says, Rohit Shetty Gave Workshop To UP Police On How To Fly Mahindra TUV.

विकास दुबे एन्काउंटर:गाडी पलटली आणि एन्काउंटरमध्ये गँगस्टर ठार, लोकांनी रोहित शेट्टीची आठवण काढत म्हटले  - सिंघम सीरिजची नवीन स्क्रिप्ट मिळाली 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोहित शेट्टीने आतापर्यंत सिंघम, सिंघम रिटर्न्स, सिम्बा आणि सूर्यवंशी सारखे कॉप ड्रामा बनवले आहेत. यात पोलिस गुन्हेगारांचे एन्काउंटर करताना दाखवले गेले आहे.

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करुन फरार झालेला गँगस्टर विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. गुरुवारी विकास दुबेला पोलिसांनी उज्जैनमधून अटक केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशांचे विशेष पोलीस पथक विकास दुबेला घेऊन सकाळी कानपूरसाठी निघाले होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला आणि गाडी पलटली. गाडीचा अपघात झाल्यानंतर विकास दुबेने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केले.

विकास दुबे एन्काउंटर प्रकरणानंतर नेटकऱ्यांना दिग्दर्शक रोहित शेट्टीची आठवण झाली आहे. ही संपूर्ण एन्काउंटरची घटना रोहित शेट्टीच्या चित्रपटाच्या स्क्रीप्टसारखीच वाटत असल्याची प्रतिक्रिया नेटकरी सोशल मीडियावर देत आहेत. कॉप ड्रामा हा त्याचा आवडता विषय आहे आणि त्यावर त्याने बरेच चित्रपट केले आहेत. महागड्या गाड्यांची आदळआपट, गाड्यांच्या ब्लास्टची दृश्ये त्याच्या चित्रपटात हमखास दिसतात.

यावरुन बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले आहेत. रोहित शेट्टीला सिंघम -3 ची स्क्रिप्ट मिळाली असल्याचे काही नेटकरींनी म्हटले आहे.  यूपी पोलिसांनी रोहित शेट्टीकडून गाडी पलटवण्याची ट्रेनिंग रोहित शेट्टीकडूनच घेतली होती, असे काही नेटकरी म्हणत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'पोलिसांच्या कथेत फारसा दम नाही. त्यांनी एक उत्तम कथा लेखक आणि स्टंट दिग्दर्शकांची गरज होती, रोहित शेट्टी हे त्यापेक्षा चांगले करू शकले असते'.  एका यूजरने लिहिले, "प्रिय यूपी पोलिस, आम्ही रोहित शेट्टीचा सिंघम रिटर्न्स चित्रपट पाहिला आहे".  

रोहित शेट्टीच्या सिंघम, सिंघम रिटर्न्स, सिम्बा हे कॉप ड्रामा चित्रपट होते, ज्यामध्ये पोलिसांना बनावट एन्काउंटर करताना दाखवले गेले होते.   

0