आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्ड ड्रिंक्सवर हॉट कॉन्ट्रोव्हर्सी:रोनाल्डोने कोकच्या बाटल्या दूर सारुन दिला मोठा संदेश, भारतीय स्टार्स मात्र कोका-कोलाच नव्हे गुटखा ब्रँडमधूनही करतात कोट्यवधींची कमाई

मनीषा भल्ला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोनाल्डोने जे धाडस दाखवले, तसे भारतात होण्याची शक्यता फारच कमी आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोने युरो चषक फुटबॉल सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत कोका-कोलाच्या दोन बाटल्या दूर केल्या. त्याच्या या कृतीमुळे कोका-कोलाला चार अब्ज डॉलरचा फटका बसला. झाले असे की, तंदुरुस्तीसाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या रोनाल्डोने पत्रकार परिषदेत त्याच्या पुढयातील कोका कोलाच्या दोन बाटल्या उचलून दूर ठेवल्या आणि पाण्याची बाटली जवळ ठेवली. ही कृती करताना रोनाल्डोने पोर्तुगीज भाषेत ‘‘एगुआ’’ म्हणजेच ‘‘पाणी प्या’’ असा संदेश दिला.

रोनाल्डोच्या भूमिकेमुळे युरो-2020 च्या अधिकृत पुरस्कर्त्यांपैकी एक असलेल्या कोका-कोलाला तब्बल 29 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. कोको-कोला 1974 पासून फीफाची प्रायोजक कंपनी आहे आहे. तरीही रोनाल्डोने जे धाडस दाखवले, तसे भारतात होण्याची शक्यता फारच कमी आहे.

भारतातील स्टार्स पेप्सी, कोका-कोला, इतकेच नाही तर गुटखा ब्रँड्सचेही प्रमोशन करताना दिसतात. या ब्रँड्सकडून या कलाकारांना मोठी रक्कम मिळत असते. लोकांचे आरोग्य डोळ्यापुढे ठेऊन या ब्रँड्सला नकार देणार सेलिब्रिटी क्वचितच आढळतात.

जाहिरातीसाठी एकत्र आले अजय-शाहरुख अजय देवगण आणि शाहरुख खान यांनी एकत्र कधीही चित्रपट केला नाही. असे म्हटले जाते की, या दोघांमधील संबंध फारसे चांगले नाहीत. कोणताही चित्रपट निर्माता त्यांना एकत्र आणू शकला नाही, परंतु मार्च 2021 मध्ये त्यांनी विमल गुटखा ब्रँडसाठी एकत्र काम केले. शाहरुख खान आणि अजय देवगण यांनी विमल इलाचीच्या जाहिरातीमध्ये एकत्र काम केले आहे. जेव्हा ही जाहिरात तीन महिन्यांपूर्वी आली, तेव्हा #NoMySRK ट्विटरवर ट्रेंड झाले होते.

काही चाहत्यांचा असा युक्तिवाद होता की, शाहरुख विमल इलायचीची जाहिरात करत आहे आणि ते गुटखा नाही, पण काही लोकांनी मात्र यावर आक्षेप नोंदवला. शाहरुख आणि अजयसारखे कलाकार जेव्हा विमल इलायचीची जाहिरात करतात तेव्हा त्यासोबत गुटख्याचे प्रमोशन होऊन जाते.

आमिर कोला आणि सनी लिओनीने पान मसालाची जाहिरात सोडली

आमिर खानच्या टीमने भास्करला सांगितले की, आमिर खान सध्या कोणत्याही कोला ब्रँडला एंडोर्स करत नाहीये. काही वर्षांपूर्वी त्याने या ब्रँडला एंडोर्स केले होते.

सनी लिओनी 'महक' पान मसाल्याच्या ब्रँडला एंडोर्स करायची. पाच वर्षांपूर्वी पान मसाला आरोग्यासाठी चांगला नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर सनीने पान मसाल्याची जाहिरात करणार नसल्याची घोषणा केली होती.

जेव्हा भाजपने आमिरला लक्ष्य केले होते

केंद्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने यापूर्वी कोका-कोला आणि पेप्सीच्या जाहिराती बंद करण्याची मागणी केली आहे. 2006 मध्ये जेव्हा भाजप विरोधी पक्ष होता, तेव्हा ही मागणी केली गेली होती.

आमिर खान यांनी नर्मदा प्रकल्पाविरोधात निवेदन दिले होते. तेव्हा गुजरातमध्ये भाजपचे सरकार होते. 'फना' चित्रपटाला गुजरातमध्ये रिलीज होण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. यासह अनेक ठिकाणी कोका-कोलाच्या बाटल्या, अ‍ॅड बॅनर आणि इतर मालमत्तांचे नुकसान करण्यात आले होते.

विराट म्हणाला होता - मी स्वत: जे पित नाही ते मी लोकांना पिण्यास सांगणार नाही

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सुरुवातीला पेप्सीसाठी एंडोर्समेंट करत असे. परंतु चार वर्षांपूर्वी पेप्सीबरोबरचा करार रिन्यू करण्यास त्याने नकार दिला. त्यावेळी विराट म्हणाला होता की, मी स्वत: जे सॉफ्ट ड्रिंक पीत नाही, ते फक्त काही पैशांसाठी मी इतरांना ते पिण्यास सांगू शकत नाही.

सर्वप्रथम गोपीचंद यांनी सोडला होता कोला ब्रँड
बॅडमिंटनचे महान खेळाडू पी. गोपीचंद यांनी कोला ब्रँडचे प्रमोशन करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. पुलेला गोपीचंद यांनी 'बिझनेस स्टँडर्ड' ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी 1997 पासून कोला प्रॉडक्ट्सचा वापर बंद केला होता. मी कोला ब्रँडच्या एंडोर्समेंटला नकार दिला, हे माझ्या कुटुंबीयांना आणि माझ्या मित्रांना माहिती आहे असे गोपीचंद यांनी सांगितले होते. आपण त्यास माझे वैयक्तिक नीतिशास्त्र म्हणू शकता, असेही ते म्हणाले होते.

प्रीती झिंटाच्या पंजाब किंंग्जचा पार्टनर कोका-कोला

भारतातील कोणताही स्पोर्ट्स सेलिब्रिटी कोणत्याही कोला ब्रँडला थेट एंडोर्स करत नाही. पण प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्जचा कव्हरेज पार्टनर कोका-कोला आहे. म्हणूनच पंजाब किंग्जमधील खेळाडू कोका-कोलाच्या जाहिरातीमध्ये दिसू शकतात.

पी.व्ही. सिंधू आणि धोनी या कंपन्यांच्या स्पोर्ट्स ड्रिंकला करतात एंडोर्स

भारतात कोणताही खेळाडू सॉफ्ट ड्रिंक्स एंडोर्स करत नाही. परंतु पी.व्ही. सिंधू पेप्सी कंपनीच्या गेट रेड ड्रिंकला एंडोर्स करते. कंपनीच्या दाव्यानुसार ते एक स्पोर्ट्स ड्रिंक आहे. त्याचप्रमाणे महेंद्रसिंग धोनी कोका कोला कंपनीचे स्पोर्ट्स ड्रिंक पॉवरेडे एंडोर्स करतो.

अ‍ॅड गुरू प्रह्लाद कक्कर.
अ‍ॅड गुरू प्रह्लाद कक्कर.

येथे तर ब्रँडद्वारे स्टारडम मोजले जाते
अ‍ॅड गुरू प्रह्लाद कक्कर यांनी भास्करशी बोलताना सांगितले की, आपल्याकडे स्टारडमचे मोजमाप काही ब्रँड्सद्वारे केले जाते. जसे की एखाद्याला पेप्सीची जाहिरात मिळाली तर तो एक मोठा स्टार आहे. येथे ही जाहिरात लज्जास्पद नव्हे तर एक अचिव्हमेंट आहे.

रेडिफ्यूजनचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि ह्युमन ब्रँड्सचे तज्ज्ञ डॉ. संदीप गोयल
रेडिफ्यूजनचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि ह्युमन ब्रँड्सचे तज्ज्ञ डॉ. संदीप गोयल

एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी 5-7 कोटी घेतात कलाकार

रेडिफ्यूजनचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि ह्युमन ब्रँड्सचे तज्ज्ञ डॉ. संदीप गोयल म्हणाले की, आपल्याकडे सेलिब्रिटी पैशांना महत्त्व देतात. सेलिब्रिटी एन्डोर्समेंट गेममध्ये पैसाच सर्वकाही आहे. सेलिब्रिटींकडे प्रसिद्धीच्या शिखरावर राहण्यासाठी खूप मर्यादित वेळ असतो. यावेळी, त्यांना त्यांची स्टार व्हॅल्यू जितकी शक्य असेल तितकी कॅश करायची असते.

आपल्याकडे बड्या स्टारला अशा ब्रँडच्या जाहिरातीसाठी 5 ते 7 कोटी रुपये मिळतात. काही दिवसांच्या अ‍ॅड शूटसाठी एवढे पैसे मिळणे ही एक मोठी गोष्ट आहे. अशा ऑफर्सच्या आमिषाला बळी न पडणारे फार क्वचितच सेलिब्रिटी आहेत. येथे पैसे खूप असतो आणि ते जाहिरातींच्या माध्यमातून सतत लोकांच्या डोळ्यासमोर असतात. हा त्यांच्यासाठी एक प्रकारे बोनस आहे.

काही काळापासून आता फेअरनेस क्रिमविरूद्ध वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे आता स्टार्स फेअरनेस क्रिमच्या जाहिराती टाळू लागले आहेत.

ब्रँड तज्ज्ञ आणि हरीश बिजूर कंसल्ट्सचे संस्थापक हरीश बिजूर
ब्रँड तज्ज्ञ आणि हरीश बिजूर कंसल्ट्सचे संस्थापक हरीश बिजूर

आता स्टार्स बोलले नाही तर लोक बोलू लागतील

ब्रँड तज्ज्ञ आणि हरीश बिजूर कंसल्ट्सचे संस्थापक हरीश बिजूर म्हणाले की, रोनाल्डोनंतर आता भारतीय कलाकारांनादेखील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून भूमिका घ्यावी लागेल. जर ते बोलले नाही तर सार्वजनिक दबाव वाढेल. लोक सोशल मीडियावर बोलतील.

त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात आता प्रो-मार्केट नव्हे तर प्रो- कंज्युमर ट्रेंड सुरु आहे. बर्‍याच सेलेब्रिटींनी यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली आहे आणि ते सांगू लागले की जे लोकांसाठी चांगले नाही, ते सोडून द्यायला हवे आणि त्याचे समर्थन करु नये. त्यांना ब्रँडच्या नव्हे तर आपल्या चाहत्यांच्या हिताचा विचार करु लागले आहेत.

40 लाख ते 12 कोटींमध्ये एक जाहिरात तयार होते

हरीश बिजूर यांनी सांगितले की, कोला जाहिरातींसाठीचे बजेट 40 लाख ते 12 कोटी रुपयांपर्यंत असू शकते. हे कोण आणि किती स्टार्स यात काम करतात यावर अवलंबून असते.

देशातील बहुतेक स्टार्सनी मौन बाळगले
आपले स्टार्स कोला किंवा आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांच्या ब्रँड्सना एंडोर्स करणे सुरु ठेवणार का? हा प्रश्न भास्करने सलमान खान, टायगर श्रॉफ, हृतिक रोशन, शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्या टीमला विचारला होता, पण बातमी लिहीपर्यंत त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

बातम्या आणखी आहेत...