आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीत राज कौशल:रोनित रॉयने जवळल्या मित्राच्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाला- राजची इच्छा होती की त्याच्या वेब सीरिजमध्ये मी 'मास्टरमाइंड'ची महत्त्वाची भूमिका साकारावी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजने रोहितला मास्टरमाइंडच्या भूमिकेची ऑफर दिली होती

अभिनेता रोनित रॉयने त्याचा जवळचा मित्र, दिवंगत चित्रपट निर्माता राज कौशल यांच्या आठवणींना उजाळा दिला. रोनितने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच राजने मला फोन करुन त्याच्या वेब सीरिजमध्ये मी 'मास्टरमाइंड'ची महत्त्वाची भूमिका साकारावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

राजने रोहितला मास्टरमाइंडच्या भूमिकेची ऑफर दिली होती

रोनित रॉय म्हणाला, “राजने मला फोनवर म्हटले की, त्याच्या वेब सीरिजमध्ये मी एक महत्त्वाची भूमिका साकारावी अशी त्याची इच्छा आहे. त्याने मला सीरिजच्या पहिल्या भागासाठी तारखा देण्यास सांगितले होते. सीरिजच्या दुस-या भागातही मला सहभागी करुन घेण्याची त्याने कदाचित योजना आखली असेल. राज मला म्हणाला होता की, पहिल्या भागाच्या शेवटी मास्टरमाइंडचा चेहरा सगळ्यांसमोर येईल."

रोनितने या सीरिजचे शूटिंग सुरू केले नव्हते
जेव्हा रोनितला विचारले गेले की त्याने या शोसाठी शूट केले आहे का? त्याचे उत्तर देताना रोनित म्हणाला, "नाही, माझं शूट झालं नाही. मला वाटतं की निर्माते राज यांच्याशी या शोच्या कार्यपद्धतीवर चर्चा करत होते, त्यावेळी तौक्ते चक्रीवादळाच्या फटका सगळ्यांना बसला होता. त्यावेळी हे काम बाजुला राहिले होते,' असे रोनितने सांगितले.

बॉलिवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक
अभिनेता आशीष चौधरी, ओनिर, रोहित रॉय, नेहा धूपिया, अर्शद वारसी, दिव्या दत्ता, विक्की कौशल आणि हंसल मेहता यांच्यासह अनेक कलाकारांनी राज कौशल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. अभिनेता रोहित बोस रॉयने राज यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले होते, 'राज, हा केवळ माझा मित्र नव्हता तर तो माझा भाऊ देखील होता. यापुढच्या प्रवासतही तू इतरांना आनंद वाटशील याची मला खात्री आहे... तुला नेहमीच घराबद्दल ओढ, ममत्व वाटायचे. त्यामुळे आता देखील स्वर्गात गेल्यावर तू राहण्यासाठी असेच सुंदर घर पाहशील! आम्हा सर्वांचे तुझ्यावर खूप प्रेम आहे हे तुला देखील माहिती होते. परंतु दुर्दैवाने ते तुला सांगण्याची वेळ मात्र कधीच आली नाही. नंतर सांगू नंतर सांगू म्हणत म्हणत अनेक आठवडे उलटले आता मात्र ती वेळ कधीच येणार नाही. पलिकडच्या विश्वात लवकरच आपण भेटू. राज तुला भावपूर्ण श्रद्धांजली.' अशा शब्दांत रोहितने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

9 वर्षे डेटिंग केल्यानंतर मंदिरा आणि राज यांनी केले होते लग्न
मंदिरा बेदीचे पती राज कौशल हे एक दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांनी 'प्यार में कभी-कभी', 'शादी का लड्डू' आणि 'अँथनी कौन है' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. याशिवाय त्यांनी 'माय ब्रदर निखिल', 'शादी का लड्डू' आणि 'प्यार में कभी-कभी' या चित्रपटांची निर्मिती देखील केली होती. जाहिरात विश्वातही राज यांचे मोठे नाव होते. बुधवारी पहाटे साडे चार वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्नी मंदिराने त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला होता. मंदिरा आणि राज यांची पहिली भेट 1990 मध्ये मुकूल आनंद यांच्या घरी झाली होती. त्यावेळी राज आनंद यांचे चीफ असिस्टंट होते. दोघांनी नऊ वर्षे डेटिंग केल्यानंतर 1999 मध्ये लग्न केले होते. असे म्हटले जाते की मंदिरा आणि राज यांच्या लग्नामुळे त्यांचे कुटुंबिय फारसे आनंदी नव्हते. मंदिरा आणि राज यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुलगी ताराला दत्तक घेतले होते. त्यांना एक मुलगा असून वीर त्याचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...