आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RRR चा जपानमध्येही जलवा:'3 इडियट्स' पछाडले, ठरला जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा तिसरा भारतीय चित्रपट

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात जबरदस्त यश मिळाल्यानंतर RRR या चित्रपटाने आता कमाईच्या बाबतीत जपानमध्ये विक्रम प्रस्थापित केला आहे. जपानमध्ये 240 स्क्रीन्समध्ये रिलीज झालेल्या RRR ने 17 दिवसांत भारतीय रुपयांमधून सुमारे 10 कोटींची कमाई केली आहे. यासह आमिर खानच्या 3 इडियट्स चित्रपटाला मागे टाकून हा जपानमधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. तर 24 वर्षांपूर्वी रिलीज झालेला रजनीकांतचा मुथू आणि एसएस राजामौलींचा बाहुबली 2 हे पहिल्या आणि दुस-या स्थानावर आहेत. चित्रपटाचे मुख्य अभिनेते राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांनी जपानमध्ये त्यांच्या चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन केले होते.

24 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला रजनीकांत यांचा चित्रपट आजही अव्वल स्थानावर
जपानमधील भारतीय चित्रपटांच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर 24 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला रजनीकांत यांचा मुथू चित्रपट 22 कोटींच्या कमाईसह आजही अव्वल स्थानावर आहे. तर बाहुबली 2 जवळपास 16 कोटींच्या कमाईसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 3 इडियट्स 9 कोटींच्या कमाईसह तिसर्‍या स्थानावर होता, पण आता RRR ने आता 10 कोटींची कमाई करत तिसरे स्थान मिळवले आहे.

RRR जगभरात 1200 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला होता
RRR ने आतापर्यंत जगभरात 1200 कोटींहून अधिकची कमाई केली आहे आणि अजूनही जगाच्या अनेक भागांमध्ये त्याची कमाई सुरु आहे. जपानशिवाय अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये हा चित्रपट नुकताच पुन्हा प्रदर्शित झाला. अमेरिकेत या चित्रपटाने 110.7 कोटी रुपयांचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे. यूएईमध्येही या चित्रपटाने 37.8 कोटींचा व्यवसाय केला आहे.

पॅन इंडिया आहे हा चित्रपट
एसएस राजामौली दिग्दर्शित RRR हा पॅन इंडिया चित्रपट असून यात राम चरण, ज्युनिअर NTR, आलिया भट्ट आणि श्रिया सरन मुख्य भूमिकेत आहेत. अजय देवगणनेही या चित्रपटात कॅमिओ केला होता. हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

बातम्या आणखी आहेत...