आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठ्या पडद्यावरील संघर्ष:बॉक्स ऑफिसवर होणार आर. आर. राजामौली यांच्या 'RRR' आणि बोनी कपूर यांच्या 'मैदान'ची टक्कर, या कारणामुळे राजामौलींवर बोनी कपूर झाले नाराज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही चित्रपटांमध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे.

दिग्दर्शक आर आर राजामौली यांनी सोमवारी त्यांच्या आगामी RRR या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली होती. हा चित्रपट यावर्षी दस-याच्या मुहूर्तावर म्हणजे 13 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र राजामौली यांच्या या निर्णयामुळे निर्माते बोनी कपूर नाराज झाले आहेत.

नेमके काय झाले?
झाले असे की, निर्माते बोनी कपूर यांनी सहा महिन्यांपूर्वीच त्यांच्या आगामी मैदान या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली होती. अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला मैदान हा चित्रपट यावर्षी दस-याच्या मुहूर्तावरच म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. RRR या चित्रपटातदेखील अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे राजामौली यांनी बोनी कपूर यांच्याशी कुठलीही चर्चा न करता परस्पर रिलीज डेटची घोषणा केली. दोन्ही चित्रपटांमध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे, त्यामुळे त्याचे चाहते विभागले जाऊ शकतात आणि त्याचा चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे एकाच आठवड्यात दोन्ही चित्रपट रिलीज झाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोनी कपूर राजामौली यांच्यावर नाराज झाले आहेत.

एका मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले होते की, सध्या अशी परिस्थिती आहे, जिथे इंडस्ट्रीने एकत्र उभे राहायला हवे, त्यामुळे राजामौली यांनी असे करणे योग्य नाही.

कोरोनामुळे RRR ची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती

डीव्हीव्ही एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवला जात आहे. हा चित्रपट 1920 च्या दशकातील क्रांतिकारक अल्लुरी सीतारामा राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. हा मल्टीस्टारर पीरियड ड्रामा यापूर्वी 8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.

450 कोटींच्या बजेटमध्ये बनतोय 'आरआरआर'

'आरआरआर' हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या 5 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. रिपोर्ट्सनुसार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर सध्या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीक्वेन्सचे शूटिंग करत आहेत. 'बाहुबली' सारखी सुपरहिट सीरिज बनवणा-या राजामौलींचा 'आरआरआर' हा चित्रपट तब्बल 450 कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये तयार होत आहे.

अजय देवगणचा आगामी चित्रपट 'मैदान' हा एक स्पोर्ट्स ड्रामा बायोपिक असून सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे. सय्यद अब्दुल रहीम हा भारतीय फुटबॉल संघाचा प्रशिक्षक होते. 1950 -1963 या काळात, रहीम यांनी फुटबॉलकडे बघण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आणि देशाला आधुनिक फुटबॉलशी ओळख करून दिली. मैदान हा चित्रपट हिंदीसह तामिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...