आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'RRR' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करत आहे. 550 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत जगभरात 900 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी सांगितल्यानुसार, हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा 5वा भारतीय चित्रपट ठरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम चरणने या आनंदात चित्रपटाच्या क्रूसाठी ब्रेकफास्टचे आयोजन केले आणि भेट म्हणून सोन्याची नाणी दिली.
10 दिवसांत 900 कोटींचा व्यवसाय
व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबलन यांनी RRR चे 10 व्या दिवसाचे कलेक्शन ट्विट करून सांगितले आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर 709.36 कोटींची कमाई केली होती. त्याचवेळी, चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 41.53 कोटी, दुसऱ्या दिवशी 68.17 कोटी, तिसऱ्या दिवशी 82.40 कोटींचा व्यवसाय केला. 10 व्या दिवशी RRR ने एकूण 901.46 कोटींचा गल्ला जमवला आहे.
हिंदीत झाली 184 कोटींची कमाई
तरण आदर्श यांनी पोस्ट शेअर करून सांगितले की, 'RRR'च्या हिंदी व्हर्जनने दुसऱ्या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी भारतात 20 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने आतापर्यंत 184.59 कोटींचा व्यवसाय केला आहे. RRR ने दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 13.50 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 18 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 20.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
1 तोळ्याची सोन्याची नाणी भेट दिली
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता राम चरणने अलीकडेच RRR च्या टीमसाठी नाश्ता आयोजित केला होता. या ब्रेकफास्टला फिल्ममेकिंग डिपार्टमेंटचे प्रॉडक्शन मॅनेजर, अकाउंटंट, कॅमेरा असिस्टंट, फोटोग्राफर आणि डायरेक्शन टीमचे लोक उपस्थित होते. ब्रकेफास्टनंतर राम चरणने या सर्व लोकांना 1 किलो मिठाई आणि 1 तोळ्याचे सोन्याचे नाणे भेट दिले. या नाण्यावर एका बाजूला आरआरआरचा लोगो आणि दुसऱ्या बाजूला राम चरणचा फोटो आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.