आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिस DAY-4:'RRR' ने 4 दिवसांत जगभरात केली 562 कोटींची कमाई, मंडे टेस्टमध्ये 'द कश्मीर फाइल्स', 'सूर्यवंशी' आणि 'गंगुबाई'ला मागे टाकले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'RRR'ने चौथ्या दिवशी कमावले 72.80 कोटी रुपये

एसएस राजामौली यांचा 'RRR' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील अनेक मोठे रेकॉर्ड मोडित काढत आहे. 550 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आता अवघ्या 4 दिवसांत 560 कोटींहून अधिकचे वर्ल्डवाइड कलेक्शन केले आहे. चौथ्या दिवशी या चित्रपटाचा वर्ल्डवाइड बिझनेस 72 कोटींहून अधिक होता. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 4 दिवसांत 90 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्याचवेळी, चित्रपटाने मंडे टेस्टही पास केली आहे. या चित्रपटाने पहिल्या सोमवारी कमाईच्या बाबतीत 'द कश्मीर फाइल्स', 'सूर्यवंशी', 'गंगुबाई काठियावाडी' आणि '83' यांसारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे.

'RRR'ने चौथ्या दिवशी कमावले 72.80 कोटी रुपये
मनोबाला विजयबालन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. राम चरण तेजा, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट स्टारर 'आरआरआर'ने सोमवारची चाचणी उत्तीर्ण केली आहे, असे ते म्हणाले आहेत. या चित्रपटाने चौथ्या दिवशी (सोमवारी) वर्ल्ड वाइड 72.80 कोटींचे ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. याआधी या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी (रविवार) 118.63 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी (शनिवार) 114.38 कोटी रुपये आणि पहिल्या दिवशी (शुक्रवारी) म्हणजेच पहिल्या दिवशी 257.15 कोटी रुपयांचा वर्ल्डवाईड व्यवसाय केला होता.

4 दिवसात जगभरात केली 560 कोटींची कमाई
दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या चित्रपटाने आतापर्यंत चार दिवसांत वर्ल्डवाइड एकूण 562.96 कोटी रुपयांचे ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. हा चित्रपट केवळ तीन दिवसांत जगभरात सर्वधिक कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. मनोबाला यांनी त्यांच्या दुसर्‍या पोस्टमध्ये सांगितले की 'RRR'चे चौथ्या दिवसाचे कलेक्शन दक्षिणेकडील 5 मोठ्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या व्यवसायापेक्षा जास्त आहे. पहिल्या दिवशी 'राधे श्याम'ने 72.41 कोटी, 'अन्नाथे'ने 70.19 कोटी, 'भीमला नायक'ने 61.24 कोटी, 'वलीमाई'ने 59.48 कोटी आणि 'पुष्पा'ने 57.83 कोटींचा व्यवसाय केला होता.

हिंदी व्हर्जनने कमावले 91 कोटी
दुसरीकडे, तरण आदर्श यांनी पोस्ट शेअर करत सांगितले की, 'RRR'च्या हिंदी व्हर्जनने चौथ्या दिवशी भारतात 17 कोटी, तिसऱ्या दिवशी 31 कोटी, दुसऱ्या दिवशी 24 कोटी आणि पहिल्या दिवशी 19 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला होता. त्यानुसार, या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने आतापर्यंत म्हणजे रिलीजच्या अवघ्या 4 दिवसांत भारतात 91 कोटी रुपयांहून अधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. चित्रपटाचे हिंदी व्हर्जन पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 100 कोटींचा टप्पा ओलांडेल असेही तरण आदर्श म्हणाले आहेत.

'द कश्मीर फाइल्स', 'सूर्यवंशी' आणि 'गंगूबाई' मागे टाकले
तरण आदर्श यांनी त्यांच्या दुस-या पोस्टमध्ये 'RRR' ला सेंसेशनल म्हटले आहे. ते म्हणतात, चित्रपटाने पहिल्या सोमवारी (DAY 4) कमाईच्या बाबतीत कोरोना काळानंतर प्रदर्शित झालेल्या 'द कश्मीर फाइल्स' (15.05 कोटी), 'सूर्यवंशी' (14.51 कोटी), 'गंगूबाई काठियावाडी' (8.19 कोटी) आणि '83' (7.29 कोटी) या चित्रपटांना मागे टाकले आहे.

बातम्या आणखी आहेत...