आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओमायक्रॉनचा प्रभाव:रिलीज टळल्याने RRR ला 100 कोटींचे नुकसान, प्रमोशनचे 20 कोटी वाया गेले, परदेशातील अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे 10 कोटी परत करावे लागतील

हिरेन अंतानीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंध्रमध्ये कमी तिकीट दरामुळे आधीच 30% नुकसान
  • आता सोलो रिलीजची शक्यता कमी आहे, व्याज खर्च देखील वाढेल

'RRR' चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलल्यानंतर त्याच्या कमाईत 100 कोटी रुपयांपर्यंतचा तोटा झाला आहे. चित्रपटाच्या रिलीजला जितका उशीर होईल तितका व्याजाचा खर्चही वाढेल. चित्रपटाचे वितरण आणि इतर हक्क 890 कोटी रुपयांना विकले गेले होते. परंतु आता नवीन रिलीजच्या वेळी काही डील्सवर पुन्हा चर्चा केली जाईल. 7 जानेवारीला या चित्रपटाला सोलो रिलीजचा फायदा मिळणार होता, नव्याने रिलीजच्या वेळी हा फायदा मिळाला नाही तर कमाईत आणखी घट होऊ शकते.

प्रमोशनवर आतापर्यंत 20 कोटींचा खर्च
RRR दिग्दर्शक एसएस राजामौली आणि मुख्य अभिनेते रामचरण तेजा आणि ज्युनियर एनटीआर गेल्या एक महिन्यापासून दक्षिण भारतातील प्रत्येक मोठ्या शहरात आणि मुंबईसह देशाच्या इतर भागात प्रमोशन करत होते. चित्रपटात कॅमिओ करत असलेले अजय देवगण आणि आलिया भट्ट यांनीही अनेक प्रमोशनमध्ये त्यांच्यासोबत भाग घेतला होता. टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये दिसण्याव्यतिरिक्त अनेक लाइव्ह कार्यक्रमही झाले. हे सर्व आणि सोशल मीडियावरील प्रमोशन असे एकत्र करून निर्मात्यांनी आतापर्यंत 20 कोटींहून अधिक खर्च केले आहेत.

आता जेव्हा चित्रपटाची नवीन रिलीज डेट निश्चित होईल, तेव्हा पुन्हा प्रमोशनचा खर्च केला जाईल. कदाचित, रिलीज पुढे ढकलल्यानंतर, पुन्हा चित्रपटाबद्दल बज निर्माण करण्यासाठी अधिक खर्च करावा लागू शकतो. 20 कोटींचा हा खर्च बुडाल्यात जमा आहे, पुढील 3-4 महिन्यांनंतर चित्रपट पुन्हा प्रदर्शित होईल, तेव्हा निर्मात्यांना प्रमोशनवर पुन्हा 20-30 कोटी रुपये खर्च करावे लागतील.

ओवरसीज बुकिंगचे 10 कोटी परत करावे लागतील
आरआरआरचे प्रदर्शन पुढे ढकलण्याच्या निर्णयाला उशीर होण्यामागचे एक कारण म्हणजे या चित्रपटासाठी ओवरसीजमध्ये अ‍ॅडव्हान्स तिकीट बुकिंग झाली होती. तेलुगू उद्योगातील सूत्रांच्या मते, या बुकिंगसाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा परतावा देण्याची वेळ आली आहे. यामुळे, भविष्यातील ओवरसीज डीलमध्येही रेट निगोशिएट करता येतील.

आंध्रमधील कमाई 50 कोटींनी कमी होईल

आंध्र प्रदेशमध्ये तिकीट दराबाबत चित्रपट निर्माते आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. येथे सरकारने तिकीट दराची मर्यादा निश्चित केली आहे. आरआरआरच्या निर्मात्यांनी यापूर्वी राज्य सरकारला त्यांच्या मोठ्या बजेटच्या चित्रपटाची किंमत वसूल करण्यासाठी तिकीट दर वाढवण्याची परवानगी द्यावी, असे आवाहन केले होते.

RRR च्या आंध्र रिलीजचे हक्क 165 कोटी रुपयांना विकले गेले होते, परंतु कमी तिकीट दरांमुळे, वितरकांनी मूळ डीलमध्येही कपात करण्याची मागणी केली होती. निर्माते आणि वितरक यांच्यात 30% कपातीवर सहमती झाली आहे. याचा अर्थ RRR ला या राज्यातील वितरकांकडून सुमारे 50 कोटी रुपये कमी मिळतील.

रिलीज होण्यास विलंब झाल्यामुळे फायनान्सरचे व्याज वाढणार

असा अंदाज आहे की, आता 'RRR' एप्रिल 2022 मध्ये रिलीज होऊ शकतो. तोपर्यंत देशातील परिस्थिती सामान्य झाली नाही, तर हा चित्रपटही सप्टेंबर 2022 पर्यंत पुढे खेचला जाऊ शकतो. याचा अर्थ या चित्रपटातील गुंतवणुकीवरील व्याजाचा बोजा इतके दिवस वाढत राहील. चित्रपटाच्या 450 ते 500 कोटींच्या बजेटनुसार ही रक्कम मोठी असू शकते.

सोलो रन मिळण्याची आशा आता नगण्य
संपूर्ण तेलुगू चित्रपट इंडस्ट्री RRR साठी एसएस राजामौली यांच्या पाठीशी उभी होती. इतर निर्मात्यांनी त्यांच्या रिलीजच्या तारखा पुढे ढकलल्या होत्या. हिंदीतील 'गंगूबाई काठियावाडी'ने देखील रिलीज डेट पुढे ढकलली होती. आता 'RRR' हा चित्रपट जेव्हा रिलीज होईल तेव्हा तेलुगू आणि हिंदीमध्ये अशा सोलो रिलीजचा फायदा मिळण्याची शक्यता कमी आहे. याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवरही होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...